children esakal
ग्लोबल

सावधान! लहान मुलांना ओमिक्रॉन होण्याचं प्रमाण वाढलं | South Africa

सकाळ डिजिटल टीम

जगभरात 40 देशांत ओमिक्रॉनचा (omicron) शिरकाव झालाय. अवघ्या दोन दिवसांत 23 देशांत संसर्ग परसरला आहे. ओमिक्रॉनमुळे अद्याप एकाही मृत्यूची नोंद जरी नसली तरी या ओमिक्रॉनमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान ओमिक्रॉनच्या उदयानंतर लहान मुलांना कोरोना होणाचं प्रमाण वाढलंय. दक्षिण आफ्रिकेत (south africa) आढळलेला कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंटमुळे ओमिक्रॉनचा वेगानं संसर्ग होत आहे.

लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगानं

ओमिक्रॉनच्या उदयानंतर आलेल्या चौथ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे. हॉस्पिटलमधील कोरोनाबाधितांमध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 0 ते 5 वयोगटातील मुलांच्या बाधितांचं प्रमाण समान असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनच्या उदयानंतर 9 पैकी सात राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या प्रमाणात वाढ झालीय. कोरोनाबाधितांमध्ये लसीकरण न झालेल्याचं प्रमाण जास्त असल्यानं लसीकरणाला वेग आलाय.

नवे निर्बंध जारी

कोरोनाचा संसर्ग मुलांमध्ये होऊ नये यासाठी नवे निर्बंध जारी करण्यात आलेत.. यापुढे सहा वर्षांवरील सर्वच मुलांना मास्क घाललं बंधनकारक करण्यात आलंय. 20 डिसेंबरपासून बालवाडी आणि प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. माध्यमिक शाळाही एकदिवस आड सुरू राहणार आहेत.

अनेक देशांमध्ये ख्रिसमस बाजार बंद

दक्षिण आफ्रिकेत ख्रिसमसच्या सुट्या असल्यानं लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात आलीय. आफ्रिकेतील झांबिया आणि उत्तर अमेरिकेतील मेक्सिको या देशामध्येही ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आलाय. अनेक देशांमध्ये ख्रिसमस बाजारही बंद करण्यात आलेत. आता ओमिक्रॉनमुळे नव वर्षाच्या स्वागताच्या उत्साहावर देखील विघ्न आलंय. ब्राझीलमधील रिओ दि जेनेरियो या शहरात 31 डिसेंबरच्या उत्सव रद्द करण्यात आलाय. अमेरिकेतही ओमिक्रॉनचा संसर्ग वेगानं वाढत आहे. न्यूयॉर्कमध्ये आणखीन तीन ओमिकॉनबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता अमेरिकेत येणाऱ्या सर्वच प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : पुण्यात चुलत भावाकडूनच तरुणाची निर्घृण हत्या

Sharad Pawar: राज ठाकरेंसाठी शरद पवार आग्रही; काँगेसलाही दिला मेसेज, उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

Pay and Park Issue : इस्कॉन मंदिराजवळील ‘पे अँड पार्क’मध्ये वाहनचालकांची लूट; महापालिकेच्या भक्तिवेदांत पार्किंगमधील प्रकार

Horoscope Prediction 2025: उद्या तयार होतोय केंद्र त्रिकोण योग, शनिदेवाच्या आशीर्वादाने मेष अन् मिथुनसह 'या' 5 राशींचे उजळेल भाग्य

SCROLL FOR NEXT