‘ओमिक्रॉन’मुळे जग ‘हाय अलर्ट’वर Sakal
ग्लोबल

‘ओमिक्रॉन’मुळे जग ‘हाय अलर्ट’वर

विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीचे नियम अधिक कडक

सकाळ वृत्तसेवा

लंडन : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या प्रकाराची बाधा झालेले रुग्ण युरोपातही आढळल्याने येथील देशांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम आढळलेल्या या विषाणूमुळे जगभरात सर्वत्र आरोग्य यंत्रणांना सावधानगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये विदेशांतून आलेल्या दोन प्रवाशांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे आढळून आल्यानंतर या देशाने इतर देशांमधून येणाऱ्यांसाठीचे नियम कडक केले आहेत. प्रवाशांना मास्क अनिवार्य करण्यात आला असून विमानतळावर उतरल्यावर त्यांची कोरोना चाचणीही घेतली जाणार आहे. या चाचणीचा निकाल निगेटिव्ह येईपर्यंत त्यांना विलगीकरणात रहावे लागणार आहे. ब्रिटनव्यतिरिक्त जर्मनी, इटली, बेल्जियम, इस्राईल आणि हाँगकाँग या देशांमध्येही विदेशांतून आलेल्या प्रवाशांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले काही रुग्ण आढळले आहेत. हा विषाणू अमेरिकेतही सापडला तर आश्‍चर्य वाटणार नाही, असे म्हणत अमेरिकेचे साथरोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.

कोरोना संसर्ग जगभरात पसरण्यास सुरुवात होऊन सुमारे दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या संसर्गाने आतापर्यंत जगभरात सुमारे ५० लाख जणांचा बळी घेतला आहे. या संसर्गाचे प्रमाण कमी होत असतानाच ‘ओमिक्रॉन’चा याच विषाणूचा नवा प्रकार आढळूण आल्याने जगभरातील अनेक देश ‘हाय अलर्ट’वर आहेत. अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना बंदी घातली आहे. ‘ओमिक्रॉन’पासून असणाऱ्या धोक्याबाबत अद्याप फारशी माहिती नसतानाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही काळजी घेतली जात आहे. विषाणूचा संपूर्ण अभ्यास होईपर्यंत एखाद्या देशावर अशी बंदी घालणे चुकीचे आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

ऑस्ट्रेलियातही आढळला ‘ओमिक्रॉन’

सिडने : विदेशांतून आलेल्या दोन प्रवाशांना ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याचे आढळून आल्याचे ऑस्ट्रेलिया सरकारने आज जाहीर केले. त्यामुळे कोरोना नियमांची सर्वांत कडक अंमलबजावणी करणाऱ्या या देशाने काही दिवसांपूर्वीच शिथील केलेले नियम पुन्हा कडक केले आहेत. विषाणूची बाधा झालेले दोन्ही प्रवासी दक्षिण आफ्रिकेहून आले होते. या दोघांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळून येत नव्हती, तसेच त्यांचे लसीकरणही पूर्ण झाले होते.

सावधगिरीची पावले...

  • ब्रिटनकडून दहा देशांमधून येणाऱ्या विमानांना बंदी

  • अमेरिका, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांकडून दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांना बंदी

  • युरोपातील अनेक देशांत विमानतळांवर कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी सुरु

  • आफ्रिकेतील आठ देशांमधून येणाऱ्या विमानांना थायलंडमध्ये बंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT