flight sakal
ग्लोबल

Omicron : पाकिस्तानसह ७ देशांची दक्षिण आफ्रिकेतून प्रवासावर बंदी

सूरज यादव

नव्या विषाणूला अटकाव घालण्यासाठी अनेक देशांनी घातलेली प्रवास बंदी अन्यायकारक असल्याची टीका दक्षिण आफ्रिकेने केली आहे.

दक्षिण आफ्रिका, बोट्स्वाना, हाँगकाँग आणि इस्राईलमध्ये आढळलेला ‘सार्स-सीओव्ही-२’चा ‘बी.१.१.५२९’ हा नवीन प्रकार वेगाने फैलावणारा व चिंताजनक प्रकार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) एका सल्लागार समितीने शुक्रवारी (ता.२६) जाहीर केले. ग्रीक वर्णमालेनुसार विषाणूच्या या नव्या प्रकाराला ‘ओमीक्रोन’ हे नाव संघटनेने दिले आहे. कोरोनाच्या डेल्टा प्रकाराच्या वर्गातील हा नवा विषाणू संसर्ग अधिक वेगाने होत असल्याने तो चिंताजनक आहे, असे ‘डब्लूएचओ’ने म्हटले आहे. नव्या विषाणूला अटकाव घालण्यासाठी अनेक देशांनी घातलेली प्रवास बंदी अन्यायकारक असल्याची टीका दक्षिण आफ्रिकेने केली आहे.

या देशांनी घातली प्रवास बंदी

अमेरिका ः ओमीक्रोनच्या भीतीने अमेरिकेने दक्षिण आफ्रिकेसह सात देशांतील प्रवाशांवर सोमवारपासून (ता.२९) बंदी घातली आहे. या देशांमधून अमेरिकेत येण्यास व अमेरिकेतून तेथे जाण्यास मनाई करण्यात आली असल्याचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले. अमेरिकी नागरिक व अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व असलेले व ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, त्यांना यातून सूट देण्यात आली आहे. ‘हा विषाणू वेगाने फैलावत असून आपण दक्षता बाळगायला हवी, असे बायडेन म्हणाले.

कॅनडा ः गेल्या १४ दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून प्रवास केलेल्या परदेशी नागरिकांना कॅनडाने काल प्रवेश बंदी जाहीर केली आहे. या काळात आफ्रिकेत जाऊन आलेल्या कॅनडाच्या नागरिकांना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. कॅनडात परतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून त्याचा निकाल निगेटिव्ह येईपर्यंत त्यांना विलगीकरणात राहावे लागणार आहे.

सौदी अरेबिया ः द. आफ्रिका, नामीबिया, बोट्स्वाना, झिम्बाब्वे, लिसोथो आणि एस्वाटिनी आणि मोझांबिक या देशांतील विमान सेवा सौदी अरेबियाने स्थगित केली आहे.

युरोपिय समुदाय (ईयू)ः दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांना युरोपिय देशांनी बंदी केली आहे. आफ्रिकेतून येणाऱ्या सर्व प्रवाशांची चाचणी करून त्यांनी विलगीकरणात ठेवण्याची सूचना ‘ईयू’चे अध्यक्षपद असलेल्या स्लोव्हेनियाने सर्व सदस्य देशांना केली आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकाराच्या धोक्याबद्दल निश्‍चित माहिती मिळेपर्यंत द. आफ्रिकेतील विमान सेवा थांबविण्याचे आवाहन युरोपिय महासंघ आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डर लिएन यांनी केले आहे.

ऑस्ट्रेलिया ःदक्षिण आफ्रिकेतील नऊ देशांमध्‍ये जाऊन आलेल्या विदेशी नागरिकांवर ऑस्ट्रेलियाने शनिवारी नवे निर्बंध लागू केले आहेत. या देशांमधून परतणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना १४ दिवस विलगीकरणाची सक्ती लागू केली असल्याचे आरोग्य मंत्री ग्रेग हंट यांनी सांगितले.

ब्राझील ः सहा दक्षिण आफ्रिकी देशांमधील प्रवाशांसाठी ब्राझील त्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. अध्यक्ष बोल्सोनारो यांच्या प्रमुख उच्चाधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तान - कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे पाकिस्तानकडून हाँगकाँगसह सहा आफ्रिकन देशांच्या प्रवासावर बंदी घातली आहे.

ओमीक्रोन १५ व्या क्रमाकांवर

ग्रीक वर्णमालेनुसार ओमीक्रोन हे अक्षर १५ व्या क्रमाकांवर आहे. जगभरात ठिकठिकाणी कोरोनाचे अनेक प्रकार आले आहेत. ‘सार्स-सीओव्ही-२’चा ‘बी.१.१.५२९’ हा १५ वा प्रकार आहे. यामुळेच ‘डब्लूएचओ’ने त्याला ‘ओमीक्रोन’ नाव दिले आहे. ‘सार्स-सीओव्ही-२’च्या मुख्य प्रकारांसाठी उच्चारण्यास सहज, सोपे व लक्षात राहणारी ग्रीक वर्णमालेतील नावे आरोग्य संघटनेने ३१ मे रोजी जाहीर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pashan Lake Suspension Rollback: पाषाण तलाव प्रकरणासह पाच अधिकाऱ्यांचे निलंबन मागे; विभागीय चौकशी रद्द करून केवळ बदलीवर समाधान

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीतील एसटी महामंडळाच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू

'ठरलं तर मग'मधून जुन्या साक्षी शिखरेची एक्झिट; तिच्याजागी मालिकेत दिसणार नवी अभिनेत्री, हे आहे कारण

Pune Solapur Accident: लोणी काळभोरमध्ये गॅस टँकरची दुचाकीला धडक; तानाजी काळभोर यांचा जागीच मृत्यू

IND vs AFG ODI: रोहित शर्मा, हार्दिक पांड्या OUT; दोन खेळाडूंचे पदार्पण! वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT