Omicron Variant Effect on Asia Country  esakal
ग्लोबल

ओमिक्रॉनपासून आशियायी देश सध्या सुरक्षित

आगामी काळात जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भागात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

सकाळ वृत्तसेवा

तैपेई : ओमिक्रॉनपासून (Omicron Variant) आशियातील बहुतांश देश स्वत:ला सुरक्षित ठेवण्यास यशस्वी राहिले असले तरी उर्वरित जगात ओमिक्रॉनचा फैलाव वेगाने होत आहे. परंतु आगामी काळात जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भागात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

परदेशातून येणाऱ्या नागरिकांना विलगीकरणात राहण्याची सक्ती आणि मास्क घालण्याचे बंधन यासारख्या नियमांमुळे कोरोना संसर्गाचा वेग कमी होण्यास हातभार लागला आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि थायलंड येथे अलिकडेच परदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी कडक नियम लागू केले होते. आता काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. (Omicron Variant Effect on Asia Country)

आगामी काही महिने महत्त्वाचे राहू शकतात, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. यासंदर्भात जपान सरकारचे आरोग्य सल्लागार डॉ. शिगेरू ओमी यांनी म्हटले की, एकदा का विषाणूचा वेग वाढला तर रुग्णसंख्या देखील तितक्याच वेगाने वाढू शकते. यावर्षी सुरवातीला कोविडचा उद्रेक झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना भारतात, १.४ अब्ज लोकसंख्येच्या देशात ७०० पेक्षा अधिक लोकांत ओमिक्रॉन विषाणू आढळून आल्याने पुन्हा एकदा कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे.

ऑस्ट्रेलियात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असताना गेल्या काही दिवसांत ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढत चालला आहे. याशिवाय थायलंडमध्ये ७०० रुग्ण, दक्षिण कोरियात ५०० पेक्षा अधिक असून जपानमध्ये ३०० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. चीनमध्ये सर्वाधिक कडक निर्बंध लागू असताना तेथे किमान ८ जणांना ओमिक्रॉन झाल्याचे सांगितले जात आहे.

तैवानमध्ये मास्क बंधनकारक

तैवानच्या प्रमुख शहरात मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर मॉडर्नाचा बुस्टर डोस देण्यास सुरवात झाली आहे. फायजर, ॲस्ट्राझेनेका आणि मॉडर्ना लशीचे बुस्टर डोस ओमिक्रॉनविरोधात पुरेशी सुरक्षा देऊ शकत नसले तरी प्रभावी ठरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT