Omicron Variant Research News Updates Sakal
ग्लोबल

ओमिक्रॉन व कोरोनाच्या व्हॅरिएंटना नामोहरम करणाऱ्या प्रतिपिंडांचा शोध

ओमिक्रॉन व कोरोनाच्या इतर व्हॅरिएंटना नामोहरम करणाऱ्या प्रतिपिंडे शोधण्यात संशोधकांना यश आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ विषाणुमुळे (Omicron variant) चिंतेचे वातावरण असून भारतातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर एका दिलासादायक बातमी आहे. ओमिक्रॉन व कोरोनाच्या इतर व्हॅरिएंटना नामोहरम करणाऱ्या प्रतिपिंडे शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. ‘नेचर’ या नियतकालिकात यासंदर्भातील संशोधन प्रकाशित झाले.

ओमिक्रॉन व भविष्यात तयार होऊ शकणाऱ्या कोरोनाच्या इतर विषाणुंविरुद्ध लस निर्माण करण्यात व प्रतिपिंडे उपचारासाठी या संशोधनाची मदत होऊ शकते. विषाणुमध्ये उत्परिवर्तन (म्युटेशन) होत असतानाही प्रतिपिंडेमधील बदल न होणाऱ्या भागावर संशोधकांनी लक्ष्य केंद्रित केले. (Omicron Variant Latest Research News Updates)

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील औषधशास्त्र विभागातील प्रा.डेव्हिड वेसलर म्हणाले, की या संशोधनामुळे स्पाईक प्रोटिनवरील प्रतिपिंडांवर लक्ष्य केंद्रित करून कोरोनाच्या सतत उत्क्रांत होणाऱ्या विषाणुवर मात करता येऊ शकेल. स्पाईक प्रोटिनमधील एवढ्या मोठ्या प्रमाणावरील उत्परिवर्तनामुळे रोगप्रतिकार शक्तीला चकमा देण्याची क्षमता ओमिक्रॉनमध्ये कशी विकसित होते, या प्रमुख प्रश्नाचे उत्तर आम्ही शोधत आहोत.

ओमिक्रानच्या स्पाईक प्रोटिनमध्ये कोरोनाच्या इतर विषाणुंपेक्षा खूपच जास्त म्हणजे ३७ वेळा उत्परिवर्तन झाले आहे. याच स्पाईक प्रोटिनच्या माध्यमातून विषाणू शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे, ओमिक्रॉन वेगाने फैलावत असून यापूर्वी संसर्ग झालेल्यांना तसेच लस घेतलेल्यांनाही तो संक्रमित करत आहे. या या उत्परिवर्तनांच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी संशोधकांनी कोरोनाप्रमाणेच स्पाईक प्रोटिनची निर्मिती करू शकणाऱ्या विषाणुची प्रतिकृती असणारा कमजोर विषाणू (स्यूडोव्हायरस) तयार केला.

त्यानंतर, संशोधकांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या विषाणुप्रमाणे तसेच ओमिक्रॉनप्रमाणे स्पाईक प्रोटिन असणाऱ्या विषाणुंची निर्मिती केली. संशोधकांनी वेगवेगळे स्पाईक प्रोटिनचे प्रकार पेशींच्या पृष्ठभागावरील प्रोटिनला कशा प्रकारे बांधून ठेवतात, याचे निरीक्षण केले. यावेळी, कोरोनाच्या सुरवातीच्या विषाणुंच्या तुलनेत ‘ओमिक्रॉन’ चे स्पाईक प्रोटिन जवळपास अडीच पटींनी सक्षम असल्याचेही आढळले.

चार प्रकारातील प्रतिपिंडे

सध्या मंजूर केलेल्या एका प्रतिपिंडे उपचाराखेरीज इतर उपचारांची ओमिक्रॉनविरुद्धची क्षमता कमी झाली नसल्याचे प्रयोगशाळेतील संशोधनात आढळले. केवळ सोट्रोव्हिमॅब या प्रतिपिंडांमध्ये ती दोन ते तीन पटीनी कमी झाल्याचेही लक्षात आले. संशोधकांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या संसर्गातून तयार झालेल्या प्रतिपिंडांच्या व्यापक चाचण्या केल्या. कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूंवर मात करू शकणाऱ्या चार प्रकारांतील प्रतिपिंडे संशोधकांनी ओळखल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT