ISRO Sakal
ग्लोबल

इस्रोची ‘गगनयान’ मोहीम लांबणीवर; अध्यक्ष के. सिवान यांची माहिती

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची डिसेंबरमधील महत्त्वाकांक्षी पहिली मनुष्यरहित अंतराळ मोहीम लांबणीवर पडली आहे.

पीटीआय

बंगळूर - भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची (ISRO) डिसेंबरमधील महत्त्वाकांक्षी पहिली मनुष्यरहित अंतराळ मोहीम (Space Mission) लांबणीवर पडली आहे. ‘गगनयान’ (Gaganyan) या मानवी अंतराळ मोहिमेचा भाग असलेल्या या मनुष्यरहित अंतराळ मोहिमेला लॉकडाउनमुळे (Lockdown) हार्डवेअरच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. येत्या डिसेंबरमध्ये मनुष्यरहित मोहीम शक्य नाही. ती पुढील वर्षी पार पडेल, असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवान (K Sivan) यांनी सांगितले. मनुष्यरहित मोहिम लांबल्याने गगनयान मोहीमही लांबणीवर पडली आहे. (On the Extension of ISROs Gaganyan Mission President K Sivan Information)

गेल्या काही महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांत कोरोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे, इस्रोला मनुष्यरहित मोहिमेसाठी होणारा हार्डवेअर पुरवठा होऊ शकला नाही. ‘गगनयान’ या मानवी मोहिमेपूर्वी चाचणी म्हणून मनुष्यरहित मोहिमेत दोन अवकाशयाने अंतराळात पाठविण्यात येणार आहेत. गगनयान मोहिमेत तीन अंतराळवीरांना पाठविण्यात येणार असून ते पृथ्वीच्या खालील कक्षेत (लो अर्थ ऑरबिट) पूर्वनिर्धारित कृती करणे. त्यानंतर, त्यांना पृथ्वीवरील नियोजित ठिकाणी परत आणणे, हा उद्देश आहे. इस्रोकडून मोहिमेचा आराखडा तसेच दस्ताऐवजीकरण करण्यात आले असून गगनयानसाठीच्या हार्डवेअरची निर्मिती व पुरवठा देशभरातील अनेक उद्योगांकडून केला जात आहे. मात्र, लॉकडाउनमुळे यात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे, मोहीम लांबणीवर पडणार आहे.

केंद्रीय अंतराळ मंत्री (स्वतंत्र कार्यभार) जितेंद्र सिंह यांनी फेब्रुवारीत इस्रोची पहिली मनुष्यरहित मोहीम डिसेंबर २०२१ तर दुसरी मोहीम डिसेंबर २०२१ मध्ये होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, मानवी अंतराळ मोहिमेचे प्रात्यक्षिक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी ‘गगनयान’ मोहिमेची घोषणा केली होती.

अंतराळवीरांना खडतर प्रशिक्षण

‘गगनयान’मोहिमेसाठी चार भारतीय अंतराळवीरांना रशियात अंतराळ उड्डाण प्रशिक्षण दिले आहे. त्यानंतर, आता भारतात त्यांना शारीरिक, मानसिक, तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार असून साधारणपणे पुढील महिन्यापासून ते सुरू होईल, असे सिवान यांनी सांगितले. तज्ज्ञांच्या पथकाने त्यासाठीचा अभ्यासक्रम ठरविला आहे. अंतराळवीरांना शैक्षणिक प्रशिक्षणासह विमान, नौदल तसेच अंतराळात तग धरून राहण्याच्या चाचण्याही उड्डाणापर्यंत पुन:पुन्हा द्याव्या लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT