teachers start its corna testing in ratnagiri dabhol after 348 antigen test only 1 woman teacher report positive in dabhol 
ग्लोबल

दिलासा! कोरोनाचा भारतातील एकच व्हेरिअंट काळजी वाढवणारा - WHO

सूरज यादव

गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटच्या पूर्ण स्ट्रेनला व्हेरिअंट ऑफ कन्सर्न असं म्हटलं होतं.

नवी दिल्ली - भारतात सापडलेल्या कोरोना व्हेरिअंटबाबत आता एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं की, भारतात सर्वात आधी सापडलेल्या पहिल्या स्ट्रेनला डेल्टा असं नाव दिलं आहे. आता त्याच्या एकाच स्ट्रेनबाबत चिंता आहे. तर इतर दोन स्ट्रेनचा धोका कमी झाला आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटला B.1.617 अशा नावाने ओळखलं जातं. यामुळेच भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा हाहाकार उडाल्याचं पहायला मिळालं. हा ट्रिपल म्युटंट व्हेरिअंट आहे.

गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटच्या पूर्ण स्ट्रेनला व्हेरिअंट ऑफ कन्सर्न असं म्हटलं होतं. यावर भारताने आक्षेप घेतला होता. मात्र मंगळवारी संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संस्थेनं सांगितलं की, ातील एकच व्हेरिअंट चिंतेचा विषय आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, B.1.617.2 व्हेरिअंट धोकादायक आहे. तर दुसऱ्या स्ट्रेनचा संसर्ग कमी झाला आहे.

सर्वसामान्य लोकांना कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत माहिती सांगताना किंवा जनजागृती करताना सोपे जावे म्हणून आणि नावांमधील संभ्रम दूर करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूच्या विविध प्रकारांना ग्रीक बाराखडीचा वापर करून निश्‍चित नावे दिली आहेत. त्यानुसार, भारतात सर्वप्रथम आढळलेल्या ‘बी.१.६१७.१’ या विषाणू प्रकाराला ‘कप्पा’ आणि ‘बी.१.६१७.२’ या प्रकाराला ‘डेल्टा’ असे नाव देण्यात आले आहे.

भारतात आढळलेल्या विषाणूबाबत चर्चा करताना त्याचा ‘भारतीय प्रकार’ असा उल्लेख होत असल्याबद्दल भारताने तीन आठवड्यांपूर्वी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या अहवालात या विषाणूला ‘भारतीय’ असल्याचे कोठेही म्हटले नसल्याचे भारताने निदर्शनास आणून दिले होते. या पार्श्वभूमीवर विविध देशांमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणू प्रकारांचे शास्त्रीय नाव न बदलता, केवळ रोजच्या वापरासाठी त्यांना नवीन नावे देण्यात आली आहेत. त्यानुसार भारतातील विषाणूंना ‘कप्पा’ आणि ‘डेल्टा’ असे नाव मिळाले आहे. विषाणू प्रकारांना दिलेली नावे उच्चारण्यास आणि लक्षात ठेवण्यास सोपी आहेत. तसेच, देशांच्या नावावरून विषाणूंना ओळखले जाण्याचा अवमानास्पद वाटणारा प्रकारही टाळला जाणार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) सांगितले.

‘डब्लूएचओ’ने दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत महत्त्वाची माहिती ध्वनित करणारी शास्त्रीय नावे बदलण्यात आलेली नाहीत. मात्र, अवमानास्पद आणि संभ्रम निर्माण करणारी नावे बदलण्यासाठी केवळ चर्चेत वापरासाठी नवी नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. सर्व देशांनी या नव्या नावांचा वापर करावा. अमेरिकेत आढळलेल्या कोरोना विषाणू प्रकारांना ‘एप्सिलॉन’ आणि ‘आयोटा’ अशी नावे देण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT