who tedros 
ग्लोबल

फक्त लशीमुळे कोरोना रोखणं शक्य नाही; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

जिनिव्हा - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लस शोधण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. फायझर कंपनीनंतर आता मॉडर्नाची लससुद्धा कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी धक्कादायक असं वक्तव्य केलं आहे. फक्त लस कोरोनाचा संसर्ग रोखू शकत नाही असं WHO चे संचालक ट्रेडोस यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये कमी झालेला कोरोनाचा संसर्ग आता दुसऱ्या लाटेमुळे वाढत चालला आहे. काही देशांनी पुन्हा लॉकडाऊन केलं आहे. आतापर्यंत 54 दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जवळपास 1.3 दशलक्ष लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशावेळी जागतिक आरोग्य संघटनेनं जगाला इशाराच दिला आहे.

ट्रेडोस यांनी म्हटलं की, कोरोनाशी लढा देण्यासाठी इतर गोष्टींना पूरक म्हणून लस काम करेल. पण फक्त लस कोरोनाला नष्ट करू शकणार नाही. पुढच्या काळातही कोरोनाचे अस्तित्व राहणार आहे. त्यामुळे लोकांच्या टेस्ट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, क्वारंटाइन, सोशल डिस्टन्सिंग पाळणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लशीचा पुरवठा मर्यादित प्रमाणात असणार आहे. त्यामुळे सुरुवातीला लस देताना आरोग्य कर्मचारी, वृद्ध आणि धोका अधिक असलेल्यांना प्राध्यान्य देण्यात येईल. असे केल्यास मृतांची संख्या कमी होईल आणि आरोग्य यंत्रणाही कोरोनाशी लढण्यासाठी सक्षम होईल असं टेड्रोस यांनी म्हटलं.

शनिवारी जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एका दिवसात 6 लाख 60 हजार 905 नवीन रुग्णांची नोंद संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेकडे झाली. त्याआधी शुक्रवारी 6 लाख 45 हजार 410 इतक्या रुग्णांची नोंद झाली होती. ही आकडेवारी 7 नोव्हेंबरच्या आकडेवारीपेक्षा जास्त होती. 7 नोव्हेंबरला 6 लाख 14 हजार रुग्णांची नोंद झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT