PM Sheikh Hasina Narendra Modi esakal
ग्लोबल

बांगलादेशावर रोहिंग्यांचं मोठं ओझं, भारत बजावू शकतो मोठी भूमिका : PM शेख हसीना

'कोविडदरम्यान आम्ही सर्व रोहिंग्या समुदायाचं लसीकरण केलं. पण, ते इथं किती दिवस राहणार?'

सकाळ डिजिटल टीम

'कोविडदरम्यान आम्ही सर्व रोहिंग्या समुदायाचं लसीकरण केलं. पण, ते इथं किती दिवस राहणार?'

ढाका : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh PM Sheikh Hasina) यांनी रोहिंग्या (Rohingya) स्थलांतरितांचं वर्णन बांगलादेशसाठी मोठं ओझं असल्याचं म्हटलंय. शेख हसीना म्हणाल्या, 'दहा लाखांहून अधिक रोहिंग्या स्थलांतरितांचा बांगलादेशवर मोठा भार आहे. भारत (India) या मुद्द्यावर मोठी भूमिका बजावू शकतो आणि ते (रोहिंग्या) त्यांच्या मायदेशी परत जावेत यासाठी देश आंतरराष्ट्रीय समुदायांशी चर्चा करत आहे. रोहिंग्यांच्या उपस्थितीमुळं आमच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान हसीना पुढं म्हणाल्या, मला वाटतं की भारत ही समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. बांगलादेशातील लाखो रोहिंग्यांच्या उपस्थितीमुळं त्यांच्या राजवटीला आव्हानं निर्माण झाल्याची कबुलीही हसीना यांनी एएनआयशी बोलताना दिली. 'आमच्या देशात 11 लाख रोहिंग्या आहेत. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आमच्या शेजारी देशांशी देखील सल्लामसलत करत आहोत. त्यांनीही काही पावलं उचलली पाहिजेत, जेणेकरून ते मायदेशी परत जातील.'

रोहिंग्यांनी मायदेशी परतावं : शेख हसीना

आमच्या सरकारनं मानवतावादी पैलू लक्षात घेऊन विस्थापित समुदायाची काळजी घेण्याचा प्रयत्न केलाय. मानवतावादी आधारावर आम्ही त्यांना आश्रय देत आहोत आणि सर्व काही पुरवत आहोत. परंतु, या कोविड दरम्यान आम्ही सर्व रोहिंग्या समुदायाचं लसीकरण केलं. पण, ते इथं किती दिवस राहणार? त्यामुळं ते छावणीतच आहेत. काही लोक अमली पदार्थांची तस्करी, महिलांची तस्करी करताहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळं ते जितक्या लवकर मायदेशी परततील, ते आपल्या देशासाठी आणि म्यानमारसाठीही (Myanmar) चांगलं आहे, असंही हसीनांनी सांगितलं. आम्ही रोहिंग्यांसाठी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आसियान किंवा संयुक्त राष्ट्रांसारख्या इतर देशांशीही चर्चा करत आहोत, असं हसीना म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT