English Channel Boat Esakal
ग्लोबल

Rwanda Scheme: इंग्लिश चॅनेल ओलांडताना खचाखच भरलेली बोट उलटली, चिमुकलीसह पाच जणांचा मृत्यू

English Channel: जे लोक 1 जानेवारी 2022 नंतर अनियमित मार्गाने ब्रिटनमध्ये आले आहेत, त्यांना सुमारे 6,400 किमी दूर असलेल्या रवांडा येथे पाठवले जाईल, असे अल जझीराने वृत्त दिले आहे.

आशुतोष मसगौंडे

इंग्लिश चॅनेल ओलांडत असताना एक छोटी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान ही बोट निर्वासितांनी खचाखच भरलेली होती.

रवांडामध्ये आश्रय शोधणाऱ्यांना निर्वासित करण्याचे विधेयक मंजूर करण्याच्या यूके सरकारच्या निर्णयानंतर ही घटना घडली. मानवाधिकार गटांनी या कायद्याचे अमानवी आणि क्रूर असे वर्णन केले आहे. या सागरी वाहिनीद्वारे अनेक देशांतून निर्वासित युरोपात येत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 112 जणांना घेऊन जाणारी बोट कॅलेस या फ्रेंच बंदराच्या दक्षिण-पश्चिमेला सुमारे 32 किमी अंतरावर असलेल्या व्हिमेरेक्समधून निघाली होती. बचाव कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत ४९ जणांना वाचवले आहे. तर चार जणांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बाकीचांना ब्रिटनच्या दिशेने पाठवण्यात आले आहे.

स्थानिक प्रीफेक्ट जॅक बिलंट म्हणाले, "आज पहाटे स्थलांतरितांनी भरलेल्या बोटीचा अपघात झाला. यामध्ये एक सात वर्षांची मुलगी, एक महिला आणि तीन पुरुष अशा पाच जणांच्या मृत्यू झाला. इंजिन किनाऱ्यापासून काहीशे मीटर अंतरावर अचानक बंद झाले त्यानंतर अनेक लोक पाण्यात पडले."

अहवालानुसार, या वर्षी 6,000 हून अधिक लोक लहान, ओव्हरलोड बोटींमधून अवैधरित्या ब्रिटनमध्ये आले आहेत. दरम्यान या प्रवासात अपघातांचा जास्तीचा धोका असूनही लोक मोठ्या प्रमाणात या मार्गाने येत होते..

दरम्यान ब्रिटनहून रवांडामध्ये निर्वासित आश्रितांना पाठविण्याच्या विभाजनकारी धोरणास मान्यता मिळविण्यासाठी यूके सरकार दोन वर्षांपासून प्रयत्न करीत आहे आणि अखेरीस मंगळवारी, यूकेच्या संसदेने, आश्रितांच्या हद्दपारीस परवानगी देण्यासाठी रातोरात कायदा मंजूर केला.

रवांडा योजनेअंतर्गत, जे लोक 1 जानेवारी 2022 नंतर अनियमित मार्गाने ब्रिटनमध्ये आले आहेत, त्यांना सुमारे 6,400 किमी दूर असलेल्या रवांडा येथे पाठवले जाईल, असे अल जझीराने वृत्त दिले आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, त्या तारखेपासून 50,000 हून अधिक लोक ब्रिटनमध्ये आले आहेत.

तथापि, युनायटेड नेशन्स निर्वासित एजन्सी आणि युरोप कौन्सिलने मंगळवारी यूकेला आपल्या योजनांवर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT