Imran Khan Sakal
ग्लोबल

Pakistan : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा; 'या' तीन प्रकरणांत मिळाला जामीन

पीटीआयचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांना दिलासा मिळताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

तोशाखाना खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी इम्रान खान लाहोरहून इस्लामाबादला पोहोचले, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांना दिलासा मिळताना दिसत आहे.

लाहोरमधील न्यायालयानं (Lahore Court) माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना जाळपोळ, पोलिसांविरुद्ध हिंसाचार आणि हत्या या तीन प्रकरणांमध्ये अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीन प्रकरणांमध्ये अंतरिम जामीन 13 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.

या वर्षी मार्चमध्ये पाकिस्तानी पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पीटीआयच्या डझनहून अधिक नेत्यांविरोधात दहशतवादाचा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याविरुद्ध येथील न्यायालयीन संकुलाबाहेर तोडफोड, सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आणि गोंधळ घालणं असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तोशाखाना खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी इम्रान खान लाहोरहून इस्लामाबादला पोहोचले, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षात 25 हून अधिक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते.

याप्रकरणी अटक करण्यात आलेले पीटीआय कार्यकर्ते आणि पक्षाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. इस्लामाबाद पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सुमारे 17 पीटीआय नेत्यांची नावं आहेत. कार्यकर्त्यांनी पोलिस चौकी आणि न्यायालयीन संकुलाच्या मुख्य गेटचं नुकसान केल्याचं एफआयआरमध्ये म्हटलंय. न्यायालयीन संकुलाच्या इमारतीची जाळपोळ, दगडफेक आणि तोडफोड केल्याप्रकरणी 18 जणांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT