Shahbaz Sharif  Shahbaz Sharif
ग्लोबल

Pakistan: अर्थव्यवस्था एवढी ढासळली की पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले,"आम्ही भीक..."

पाकिस्तानला भीषण पुरामुळे जवळपास १२ बिलीयन डॉलरपेक्षा जास्त नुकसान सोसावं लागलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. मित्रराष्ट्रांनीही आता पाकिस्तानकडे सतत भीक मागणारा देश म्हणून पाहायाला सुरुवात केल्याची खंत शरीफ यांनी व्यक्त केली आहे. छोट्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांनीही आता पाकिस्तानला मागे टाकल्याचं शरीफ यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शाहबाझ शरीफ वकिलांच्या एका बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी शरीफ म्हणाले की आज जेव्हा आम्ही कोणत्याही मित्रराष्ट्रामध्ये जातो किंवा फोन करतो, तेव्हा त्यांना वाटतं की आम्ही त्यांच्याकडे पैसे मागायला आलो आहे. अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना शरीफ म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या लहान राष्ट्रांनीही आता पाकिस्तानला मागे टाकलं आहे. गेल्या ७५ वर्षांपासून आम्ही हाताचा भीक मागत भटकत आहोत. पूर येण्याआधीही देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होती. मात्र पुरामुळे अर्थव्यवस्था आणखी ढासळली आहे.

पाकिस्तानात आलेल्या भीषण पूरपरिस्थितीमुळे जवळपास १४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ३ कोटी ३० लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. गेल्या ३० वर्षांमधला सर्वात भयानक असा हा पूर आहे. यामुळे पाकिस्तानला या पुरामुळे जवळपास १२ बिलीयन डॉलरपेक्षा जास्त नुकसान सोसावं लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

SCROLL FOR NEXT