Pakistan Election 2024 Updates Latest News  
ग्लोबल

Pakistan Election : निवडणुकीत नवाझ शरीफ पराभूत तर जेलमधील इम्रान खान समर्थकांचा बोलबाला! पाकिस्तानात कोण आघाडीवर?

Pakistan Election 2024 Updates Latest News : पाकिस्तानात काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणूकीनंतर आज मतमोजणी होत असून येथील निकालाकडे सर्वांचे लागले आहे.

रोहित कणसे

Pakistan Election 2024 Updates Latest News : पाकिस्तानात काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणूकीनंतर आज मतमोजणी होत असून येथील निकालाकडे सर्वांचे लागले आहे. दरम्यान या निवडणूकीत पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक नेते आघाडीवर आहेत. तुरुंगात असूनही इम्रान खान यांच्या बाजूच्या नेत्यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे. तसेच पीटीआयने आतापर्यंत 5 जागांवर विजय देखील मिळवला आहे. यावर पीटीआयने ट्विट करून आता नवाझ शरीफ यांनाही पराभवाचा आवाज ऐकू येऊ लागला असल्याचे म्हटले आहे.

नवाझ शरीफ यांचा मनसेहरा मतदारसंघातून पराभव झाला आहे. अपक्ष उमेदवार शहजादा गस्तासाप यांनी त्यांचा दणदणीत पराभव केला आहे. शहजादा गस्तासाप यांना 74,713 मते मिळाली, तर नवाज यांना 63,054 मतांवर समाधान मानावे लागले. मनसेहरा नवाज याचा गढ मानला जातो. मात्र मनसेहरा व्यतिरीक्त नवाज शरीफ यांनी लाहौर येथून देखील उमेदवारी दाखल केली आहे. पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय निवडणुकांसाठी मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू आहे.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या 336 जागांसाठी आणि चार प्रांतांतील विधानसभांच्या निवडणुका झाल्या आहेत. इम्रान खान समर्थित उमेदवार पीएमएल-एला कडवी टक्कर देत आहेत. यावेळी निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्या पक्षाची मान्यता रद्द केली आहे. अशा परिस्थितीत इम्रान खान यांना पाठिंबा असलेले उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत इम्रान यांना पाठिंबा असलेल्या 5 उमेदवारांनी निवडणूक जिंकली आहे. तर पाकिस्तान मुस्लिम लीग-एनचे 4 उमेदवार त्यांच्या जागांवर विजयी झाले आहेत. याशिवाय पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) 4 उमेदवारांनीही त्यांच्या जागेवर निवडणूक जिंकली आहे.

पाकिस्तानमधील नॅशनल असेंब्लीच्या 336 जागांपैकी फक्त 266 जागांवर मतदान झाले आहे. बाजौर हल्ल्यात उमेदवाराचा मृत्यू झाल्याने तेथे मतदान थांबवण्यात आले होते. अशाप्रकारे 2024 च्या निवडणुकीत केवळ 265 जागांवर निवडणूक होत आहे. बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 133 जागा जिंकणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update:'मुळशीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस'; धरण ९९ टक्‍के भरले, आत्तापर्यंत एकुण ७४२८ मिमी पाऊस

Pune Rain Update:'भोर तालुक्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस'; वरंधा घाटातील महाड हद्दीत दरड कोसळली, वाहतूक बंद

Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' 10 खास गोष्टी, घरात पसरेल आनंदाची लाट

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT