ग्लोबल

धर्मसंसदेतील विखारी भाषणांचे पडसाद पाकिस्तानमध्येही! भारताला दिला सल्ला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : हरिद्वारमध्ये १७ ते १९ डिसेंबरच्या दरम्यान वेद निकेतन धाममध्ये आयोजित करण्यात आलेल्या धर्म संसदेमध्ये मुस्लिमांमविरोधात द्वेषपूर्ण आणि चिथावणीखोर (Dharma Sansad speeches) अशी वक्तव्ये करण्याचं प्रकरण सध्या देशात चांगलंच गाजतंय. या प्रकरणाचे पडसाद आता पाकिस्तानमध्येही उमटत आहेत. पाकिस्तानने सोमवारी इस्लामाबादमध्ये (Pakistan) भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रभारी उच्चायुक्तांना सावध करत मुस्लिमांप्रती चिंता व्यक्त केली आहे.

एका अधिकृत वक्तव्यामध्ये पाकिस्तानच्या मंत्रालयाने म्हटलंय की, आज भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रभारी एम सुरेश कुमार उच्चायुक्त इस्लामाबादमध्ये बोलावण्यात आलं आणि हिंदुत्व समर्थकांकडून भारतीय मुस्लीमांचा नरसंहार करण्याच्या वल्गनांबाबत चिंता व्यक्त केली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की, हे अत्यंत निषेधार्ह आहे की, ज्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये नरसंहाराच्या बाता मारल्या त्यांच्यावर भारत सरकारकडून ना कोणताही खेद व्यक्त करण्यात आला ना काही कारवाई करण्यात आली.

भारतानेही पाकिस्तानला दिलाय सल्ला

पाकिस्तानने भारताला अशाप्रकारचा सल्ला द्यायच्या आधी भारतानेही पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अन्यायावरुन सल्ला दिला आहे. अलिकडेच ऑगस्ट महिन्यात ग्रामीण पंजाबमधील रहिम यार खान क्षेत्रामध्ये एका हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणावरुन भारताने निषेध व्यक्त केला होता तसेच अल्पसंख्यांकांची काळजी घेण्याचा सल्लाही दिला होता.

विखारी धर्मसंसद

१७ ते १९ डिसेंबर दरम्यान हरिद्वारमधील वेद निकेतन धाममध्ये धर्म संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं आयोजन उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील डासना मंदिराचे पुरोहित यति नरसिंहानंद यांनी केलं होतं. या धर्मसंसदेत मुस्लीमांविरोधात तसेच देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह विधाने करण्यात आली आहेत. याबाबत आता काही आक्षेपार्ह विधानांवरुन कथित साधूंवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad: रायगड जिल्ह्यात शुक्रवार-शनिवार अवजड वाहतुकीला बंदी, कोणते मार्ग राहणार बंद?

Gopalgad Fort : शिवकालीन गोपाळगड किल्ल्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; ऐतिहासिक वारशाचा वाद आता मिटणार? मंत्री शेलारांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश

माझं चुकलं... प्रेक्षकाच्या आक्षेपार्ह कमेंटवर हसणं प्रणित मोरेला पडलं महागात; व्हिडीओही हटवला, असं काय म्हणालेला तो प्रेक्षक?

Latest Marathi News Live Update : खोणी गावातील भाजपप्रवेश केलेले कार्यकर्ते पुन्हा मनसेत, गैरसमजातून प्रवेश केल्याचा दावा

मैत्रिणीसाठी लिची घेऊन आलेल्या सुप्रिया पाठारेंच्या डब्यात निघाली भलतीच गोष्ट ! Video पाहून होईल हसू अनावर

SCROLL FOR NEXT