Imran Khan Latest News Updates,  Sakal
ग्लोबल

इम्रानकडून भारताचं पुन्हा कौतुक; परत निवडणुका घेण्याचे आवाहन

दुसऱ्या देशांचा विचार करण्यापेक्षा आपल्या देशातील जनतेचा विचार करायला पाहिजे असा टोला त्यांनी लावला आहे.

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : पाकिस्तानातील इम्रान सरकार कोसळून एक आठवडा पूर्ण झाला आहे. त्यानंतर नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी आपलं सरकार स्थापण केलं असून एका आठवड्याच्या नंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा निवडणुका घेण्याचे आवाहन त्यांच्या लाहोर येथील शक्तीप्रदर्शनात केलं आहे. (Imran Khan Latest News Updates)

आपल्या भाषणात त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं असून दुसऱ्या देशांचा विचार करण्यापेक्षा आपल्या देशातील जनतेचा विचार करायला पाहिजे असा टोला त्यांनी लावला आहे. दरम्यान सभेसाठी जमलेल्या जमावाकडे बघून "मी आत्तापर्यंत येवढी गर्दी कधी पाहिली नाही." असं म्हणाले.

"भारत हा अमेरिकेचा परस्पर सहकारी असून ते रशियाकडून तेलाची आयात करतात. जेव्हा भारताला रशियाकडून तेल न घेण्याचा सल्ला दिला जातो तेव्हा ते म्हणतात की भारताचे परराष्ट्र धोरणं हे येथील लोकांसाठी आहेत. आम्ही आमच्या लोकांच्या फायद्याचा विचार करतो. ही गोष्ट माझ्या प्रतिस्पर्ध्याला सुद्धा आवडली नाही. आमचे चीनशी असलेले संबंध सुद्धा त्यांना आवडत नाहीत." असं खान भरसभेत बोलताना म्हणाले.

त्यानंतर "आम्ही आमच्या देशातील सरकारला कधीच स्वीकारू शकत नाहीत. या चुकीसाठी फक्त एक उपाय आहे, तो म्हणजे पुन्हा निवडणुका घेणे." असं त्यांनी भाषणात सांगितलं. दरम्यान गुरुवारी त्यांनी रशिया भेटीला नकार दिला होता. जेव्हा रशिया युक्रेनमध्ये तणाव निर्माण झाला होता तेव्हा आपण आपल्या देशातील लोकांसाठी, देशाच्या गरजेसाठी तिथे गेलो होतो. असं ते बोलताना म्हणाले. त्यांच्या रशियाच्या दौऱ्यानंतर तेव्हा त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

पाकिस्तान तहरेर-ए-इस्ताफ पार्टीच्या नेत्यांनी सरकार पडण्यामागे विदेशी षडयंत्र असल्याचा आरोप करत आपल्याला हे सरकार मान्य नसल्याचं सांगितलं आहे. या सरकारचा आम्ही स्विकार करणार नसून ही चूक सुधारण्यासाठी पुन्हा निवडणुका घेण्यात याव्यात असं पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT