imran khan 
ग्लोबल

भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानची काश्मीरवरून अट

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद - भारत पाकिस्तान यांच्या फेब्रुवारीमध्ये नियंत्रण रेषेवर शांततेसाठी झालेल्या सर्व करारांचे काटेकोर पालन करण्यावर सहमती दर्शवण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुधारतील अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र आता अशी माहिती समोर येत आहे की, पाकिस्तान पुन्हा काश्मीरच्या मुद्द्यावर त्यांचं म्हणणं मांडत आहे. यामुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

पाकिस्तान पुन्हा एकदा जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत असल्याचं वृत्त हिंदूस्तान टाइम्सने दिलं आहे. 5 ऑगस्ट 2019 मध्ये राज्यसभा आणि लोकसभेत जम्मू काश्मीर आणि लडाखला वेगवेगळे केंद्र शासित प्रदेश करण्यावर शिक्कामोर्तब केलं. तसंच याठिकाणी असलेलं विशेष कलम 370 सुद्धा रद्द केलं आणि 35 ए संपुष्टात आणण्यात आले. 

दोन्ही देशांच्या प्रतिनीधींची चर्चा सध्या सुरु असल्याचंही हिंदूस्तान टाइम्सने म्हटलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकच्या पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार मोहम्मद युसुफ यांच्यात ही चर्चा होत आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने अशी कोणतीही चर्चा सुरु असल्याचं फेटाळून लावलं आहे. पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दावा केला आहे की त्यांनी कलम 371 चा मुद्दा उपस्थित केला आहे. याअंतर्गत पुर्वोत्तर राज्यांना विशेष सुरक्षा दिली जाते. जम्मू काश्मीरमध्येही हे कलम लागू व्हावं अशी मागणी त्यांची आहे. 

पाकिस्तानच्या इकॉनॉमिक कोऑर्डिनेशन कमिटीने भारतातून कापूस आणि साखर आयात करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली होती. मात्र हा प्रस्ताव इम्रान सरकारने फेटाळला आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकार प्रकरणांचे मंत्री शिरीन माजरी यांच्या माहितीनुसार, पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केलं आहे की, भारतासोबतचे संबंध आत सामान्य होणार नाहीत. जोपर्यंत जम्मू काश्मीरला कलम370 अंतर्गत पुन्हा विशेष दर्जा दिला जाणार नाही तोपर्यंत वाद होतच राहतील. 

गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. यामध्ये जम्मू काश्मीर मुद्दाही उपस्थित केला होता. तसंच कोरोना विरोधात लढ्यासाठी भारतीय नागरिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.  इम्रान खान यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं की, आम्ही दक्षिण आशियात शांतता आणि स्थैर्यासाठी कटिबद्ध आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नागपुरात १०० एकरवर ‘पल्स प्रोटिन पार्क’; ५०० कोटींच्या गुंतवणुकीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Successful Kidney Transplant: पतीच्या नवजीवनासाठी पत्नीचा त्याग! हसीना शेख यांनी किडनी दान करून अस्लम यांना दिले जीवनदान, त्यागाची भावस्पर्शी कहाणी..

Latest Marathi News Live Update : दक्षिण चेन्नईतील अनेक निवासी भागांत मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले

Majalgaon Telgaon Road Accident : माजलगावजवळ एसटी बस आणि कारची भीषण धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू, तुळजापूरला देवीच्या दर्शनला निघाले पण...

Kolhapur Mangav Murder Case : मंदिरातून परतताना अल्पवयीन मुलगीचा धारदार शस्त्राने खून, कोल्हापुरातील माणगाव धक्कादायक घटना; आरोपीचा अद्यापही शोध नाही

SCROLL FOR NEXT