Asad Ali Tur
Asad Ali Tur Sakal
ग्लोबल

पाकिस्तान पत्रकाराने हल्ल्याच्या मागे आयएसआय असल्याचा केला आरोप

वृत्तसंस्था

इस्लामाबाद - पाकिस्तानचे (Pakistan) पत्रकार (Reporter) असद अली तूर (Asad Ali Tur) यांनी आपल्यावरील हल्ल्यामागे (Attack) इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) (ISI) या गुप्तचर संस्थेच्या सदस्यांचा हात असल्याचा आरोप केला. घरात घुसलेल्या हल्लेखोरांनीच आपण आयएसआयचे हस्तक असल्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला. (Pakista Journalist Accused the ISI of Being Behind the Attack)

तूर यांनी सत्ताधाऱ्यांवर वेळोवेळी टीका केली आहे. मंगळवारी रात्री इस्लामाबादमधील त्यांच्या इमारतीत घुसून हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली.

तूर यांनी ड्युएश वेल्ले या जर्मनीच्या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. ते म्हणाले की, याआधी मी हल्लेखोरांना कधीही पाहिले नव्हते. त्यामुळे ते खरोखरच आयएसआयचे हस्तक आहेत का हे मला माहीत नाही, पण आपण आयएसआयचे आहोत या त्यांच्या म्हणण्यावर मी विश्वास ठेवेन. आता हे शोधून काढण्याचे काम पोलिसांचे आहे.

पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याबाबत तूर यांनी सरकारला धारेवर धरले. त्यांनी सांगितले की, अवैध कारवाया पत्रकार उजेडात आणतात तेव्हा सरकारच्या क्रोधाचा भडका उडतो. त्यातून पत्रकारांना लक्ष्य केले जाते. जो कुणी त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात आवाज उठवेल त्याला सोडले जाणार नाही असाच इशारा प्रसार माध्यमांना दिला जातो. त्यांची गळचेपी केली जाते.

पाकिस्तानमधील सध्याच्या राजवटीत पत्रकारांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. याचे कारण म्हणजे पाकिस्तान या राष्ट्राने अनेक अवैध गोष्टी केल्या आहेत, मात्र आता त्याचे अपेक्षित परिणाम न झाल्यामुळे शासनकर्ते हताश झाले आहेत.

- असद अली तूर, पाकिस्तानी पत्रकार

मानवी हक्क आयोगाकडून निषेध

मानवी हक्क आयोगाच्या पाकिस्तानमधील शाखेने पत्रकार तूर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हा आणखी एक हल्ला असल्याचे सांगून याप्रकरणी अधिकाऱ्यांनी चौकशी करून हल्लेखोरांना पकडून त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. या शाखेने एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, तीन अज्ञात हल्लेखोरांनी तूर यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करणे धक्कादायक आहे.

पत्रकारितेसाठी पाक धोकादायक

पाकिस्तानमधील इतर पत्रकारांनीही याचा निषेध केला आहे. पाकिस्तान फ्रिडम नेटवर्कच्या २०२१ मधील वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील वार्षिक अहवालात याबाबत गंभीर उल्लेख आहे. पाकिस्तान हे पत्रकारिता करण्यास सर्वाधिक धोकादायक ठिकाण ठरले आहे, असा यातील ठळक मुद्दा आहे.

१३८ जणांची हत्या

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाने जागतिक पत्रकारितेवर श्वेतपत्रिका प्रकाशित केली. त्यात पत्रकारितेसाठी धोकादायक असलेल्या पाच देशांत पाकिस्तानचा समावेस आहे. १९९० पासून पाकिस्तानात तब्बल १३८ पत्रकारांची हत्या झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT