Cylinder Explosion esakal
ग्लोबल

पाकिस्तान : लाहोर मार्केटमधील स्फोटात तीन ठार; २० जखमी

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तान : पाकिस्तानातील (Pakistan) लाहोर (Lahore) येथील अनारकली बाजार येथे झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जण ठार झाल्याची माहिती आहे. या स्फोटात किमान २० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाजारात उभ्या असलेल्या एका मोटारसायकलमध्ये स्फोटक (Explosion) सामग्री होती. याच गाडीत स्फोट झाला. स्फोटातील मृतांचा आकडा वाढू शकतो.

लाहोरच्या (Lahore) सर्वांत वर्दळीच्या भागातील अनारकली बाजार येथे गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान तीन जण ठार (Three killed) आणि दोन डझनहून अधिक जखमी झाले, असे पाकिस्तानी (Pakistan) वृत्तपत्रांनी म्हटले आहे. अनारकली मार्केटला लागून असलेल्या पान मंडीजवळ उभ्या असलेल्या मोटारसायकलमध्ये स्फोटक (Explosion) पदार्थ ठेवण्यात आल्याचे वृत्त होते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनेक मोटारसायकली आणि दुकाने जळताना दिसत आहेत. नागरिक भीतीने सुरक्षित स्थळी पळत आहेत. हा स्फोट इतका जोरदार होता की आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. बचाव पथकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले, तर सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासासाठी परिसराची नाकेबंदी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS इतका भ्रष्टाचारी, ७.५ कोटी एका दिवसात नाही आले; व्यवस्था झोपलेली का? राज्यपालांचा संतप्त सवाल

Latest Marathi News Live Update : शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला

Kolhapur Roads : कोल्हापुरातील रस्ते बादचं! सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका; ७७ रस्त्यांच्या सर्व्हेद्वारे २३९ पानी मुद्दे

Panchang 18 October 2025: आजच्या दिवशी मारुती स्तोत्र व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

“चित्रपटाचा बजेट–कमाई जाणून घ्यायचं प्रेक्षकांचं काम नाही” – दिग्दर्शक अनुभव सिन्हा

SCROLL FOR NEXT