kulbhushan jadhav.jpg 
ग्लोबल

मोठी बातमी ! कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार, पाकच्या संसदेत विधेयक मंजूर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांच्यासाठी दिलासादायक वृत्त आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचे पुनरावलोकन केले जाणार आहे. पाकिस्तानच्या संसदेतील कायदा आणि न्याय संबंधित स्थायी समितीने यासंबंधी एक विधेयक मंजूर केले आहे. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणीही सुरु आहे.  

'आंतरराष्ट्रीय न्यायालय (समीक्षा आणि पुनर्विचार) अध्यादेश' शीर्षक असलेले विधेयक राष्ट्रीय संसदेच्या विधी आणि न्याय संबंधित स्थायी समितीने विरोधकांच्या तीव्र विरोधानंतरही बुधवारी चर्चा करत याला मंजुरी दिली. समितीच्या चर्चेत सहभागी झालेले पाकिस्तानचे कायदा मंत्री फरोग नसीम यांनी हा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आल्याचे सांगितले. जर पाकिस्तानच्या संसदेने याला मंजुरी दिली नाही तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले नाही म्हणून निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा फरोग नसीम यांनी दिला. 

भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव यांना हेरगिरीचा आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. पाकिस्तानमधील एका लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आणि जाधव यांच्याशी राजनैतिक संपर्क साधू न दिल्याबद्दल 2017 मध्येच आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. 

हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जुलै 2019 मध्ये पाकिस्तानला जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा करण्यास सांगितले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT