Pakistani Govt admitted before Islamabad High Court marathi News  
ग्लोबल

Pakistan Govt On POK : 'पाकव्याप्त काश्‍मीर ही विदेशी भूमी...'; पाकिस्तान सरकारची इस्लामाबाद उच्च न्यायालयात कबुली

काश्मिरी कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्या अपहरणप्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावेळी सरकारी वकिलांनीच ही भूमिका मांडली.

सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद, ता. १ (वृत्तसंस्था) : पाकव्याप्त काश्‍मीर ही विदेशी भूमी असून हा भाग आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, अशी कबुली पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयात दिली आहे. काश्मिरी कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्या अपहरणप्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावेळी सरकारी वकिलांनीच ही भूमिका मांडली.

अहमद फरहाद शाह यांचे रावळपिंडी येथील त्यांच्या घरातून अपहरण झाले आहे. पाकिस्तानच्या तपास संस्थांनीच त्याला अनधिकृतपणे ताब्यात घेतले असल्याचा आरोप आहे. शाह यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्या. मोहसीन अख्तर कयानी यांनी शाह यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश सरकारला दिले होते. शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी यावर उत्तर देताना सरकारी वकीलांनी सांगितले की, अहमद फरहाद शाह हे पाकव्याप्त काश्‍मीरमधील पोलिसांच्या ताब्यात असून त्याला इस्लामाबादमध्ये आणता येणार नाही. ‘काश्‍मीर ही विदेशी भूमी असून त्यांना त्यांची स्वतंत्र राज्यघटना आणि न्यायालये आहेत. येथील न्यायालयांमधील निकालांना पाकिस्तानच्या भूमीत मान्यता नाही,’ असेही वकीलांनी सांगितले.

सरकारी वकिलांच्या या युक्तिवादावर न्या. कयानी यांनीही प्रतिप्रश्‍न विचारला. ‘व्याप्त काश्‍मीर ही विदेशी भूमी असेल तर पाकिस्तानी सैनिक तेथे प्रवेश कसा करतात?’, असे त्यांनी विचारले. तपास अधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांना बळजबरीने ताब्यात ठेवले जात असल्याबद्दलही न्या. कयानी यांनी फटकारले. पाकव्याप्त काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारत सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे.

पत्रकार शाह कोण आहेत?

कवी आणि पत्रकार असलेले अहमद फरहाद शाह हे पाकव्याप्त काश्‍मीरमधील जनतेच्या अधिकारांसाठी लढा देत असतात. ते पाकिस्तानी लष्करावर सातत्याने टीका करतात. पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये निघालेल्या सरकारविरोधी अनेक मोर्चांचे त्यांनी नेतृत्व केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Admapur land Scam : लाखात घेतली, कोट्यवधींना देवस्थानला विकली; बाळूमामा ट्रस्ट जमिनीत 11 कोटींचा गैरव्यवहार, पाच मध्यस्थींना केली अटक

Ganesh Procession : साउंड सिस्टीमच्या ट्रॅक्टर मालकास; एक वर्ष कारावासासह ३० हजारांचा दंड

Shiv Sena Political Clash : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी 'युद्ध'; दिशा सालियन प्रकरणाला 'गद्दारी'वरून प्रत्‍युत्तर, वादग्रस्त विषयांना पोलिस परवानगीने आश्चर्य

Latest Marathi News Live Update : निटचा निकाल जाहीर

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

SCROLL FOR NEXT