ग्लोबल

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची लतादीदींना श्रद्धांजली; म्हणाले, 'त्यांच्या गाण्यांनी...'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गाणसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar demise) यांचं आज रविवारी 92 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्यानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. भारतातील बॉलिवूड क्षेत्रासहितच राजकीय, क्रीडा, कला अशा सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या जाण्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन देखील शोक व्यक्त केला जातो आहे. शेजारील राष्ट्र नेपाळ, पाकीस्तान तसेच अमेरिका, इस्रायल आणि इतर अनेक देशांतून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत म्हटलंय की, लता मंगेशकर यांच्या निधनामुळे या संपूर्ण उपखंडाने खऱ्या अर्थाने एक महान गायिका गमावली आहे. त्यांच्या गाण्यांनी जगभरातील अनेकांना खूप आनंद दिला आहे.

पाकिस्तानचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलंय की, त्यांच्या आवाजाची जादू कायमस्वरुपी राहिल. पुढे त्यांनी म्हटलंय की, लता मंगेशकर या गोड गळ्याच्या गाणसम्राज्ञी होत्या, ज्यांनी अनेक दशके संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवलं. ताज नसलेल्या त्या सम्राज्ञीच होत्या. त्यांचं गाणं येणाऱ्या काळातही लोकांच्या हृदयावर असंच अधिराज्य गाजवत राहिल.

दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट संघाचा कप्तान बाबर आझमनेही ट्विट करत लता मंगेशकर यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याने ट्विट करत म्हटलंय की, एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे. त्यांचा जादुई आवाज आणि त्यांचा वारसा जगभरातील लाखो लोकांच्या हृदयात जिवंत राहील. एक अतुलनीय व्यक्तीमत्त्व! श्रीमती लता मंगेशकरजी यांना श्रद्धांजली, असं त्याने म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात Foreign Funding? दोन परदेशी कंपन्या EDच्या रडारवर, 14 कोटींचा निधी संशयाच्या भोवऱ्यात

IND vs NZ 2nd ODI Live : शुभमन गिल गोल्डन डक, विराट ७ धावांवर बाद... तरीही किंग कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; २२ चेंडूंत बरंच काही घडलं

रस्त्याच्या बाजूला पडलेलो, एका बंगाली माणसाने... अशोक सराफ यांनी सांगितली अपघाताची आठवण; म्हणाले- ड्रायव्हर ओव्हरटेक करायला गेला अन्...

Latest Marathi News Live Update: एकनाथ शिंदे जालन्यातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार

FDA Action: दिवाळीत भेसळखोरांवर 'एफडीए'चा बडगा! मुंबईतील तपासणी मोहिमेत २८ परवाने निलंबित; राजधानी बिर्याणी केंद्र बंद

SCROLL FOR NEXT