ग्लोबल

भारतासोबतच्या विसंवादाबाबत इम्रान खान म्हणतात; RSS ची विचारधारा...

विनायक होगाडे

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सध्या उझबेकिस्तानमधील ताश्कंदमध्ये सेंट्रल-साऊथ एशिया कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले आहेत. त्यावेळी त्यांना ANI कडून काही प्रश्न विचारण्यात आले. भारतासोबत संवाद आणि दहशतवाद या दोन गोष्टी एकावेळी हातात हात घालून साध्य होऊ शकतात का? असा प्रश्न खान यांना विचारण्यात आला. त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलंय. मात्र, तालिबानचं काय हा प्रश्न विचारल्यावर मात्र, त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे.

भारतासोबतचा संवाद दहशतवादासोबतच कसा होऊ शकतो, हा प्रश्न भारताच्या वतीने आहे, यावर काय बोलाल? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, भारताला तर आम्ही सांगतच आहोत, की आम्ही कितीवेळ वाटच पाहत आहोत, आमचं म्हणणं हेच आहे की, आपण एक सभ्य देश म्हणून राहुयात... मात्र, करणार काय? ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा जी आडवी आली आहे...

पुढे त्यांना विचारण्यात आलं की, तुमच्यावर हे आरोप होत आहेत की, तुमचा तालिबानवर कंट्रोल नाहीये. याचं काय उत्तर द्याल. मात्र, या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांनी टाळलेलं दिसून आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad: पावसात रायगड किल्ल्यावर जाताय? पायरी मार्ग दोन दिवस बंद, अतिवृष्टीमुळे महाड प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

IND vs ENG: "तुम्हाला खरंच गांभीर्य कळतयं का?", हर्षित राणावरून दिनेश कार्तिक गंभीर अन् टीम इंडियावर भडकला

School Bus Accident : चालकाच्या निष्काळजीपणामुळे स्कुल बसचा अपघात; २२ विद्यार्थी जखमी

Pune Khadakwasla-Fursungi Tunnel : खडकवासला–फुरसुंगी २ हजार कोटींचा बोगदा मार्च २०२९ पर्यंत पूर्ण; ३–४ टीएमसी पाणी बचत

Narmada Water: २० वर्षांनंतर महाराष्ट्राला नर्मदा हक्क मिळाला, चार राज्यांमध्ये एकमत; फडणवीसांकडून ऐतिहासिक निर्णयाची घोषणा

SCROLL FOR NEXT