Pakistan Prime Minister Imran Khan has Only three options Resignation election सकाळ डिजिटल टीम
ग्लोबल

व्यवस्थेकडून माझ्यासमोर तीनच पर्याय: इम्रान खान

सार्वत्रिक निवडणुकीसाठी आग्रही

सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा प्रचलित व्यवस्थेवर निशाणा साधला आहे. व्यवस्थेने आपल्यासमोर राजीनामा, अविश्वासाच्या ठरावाला सामोरे जाणे आणि निवडणुका असे तीन पर्याय ठेवले होते, असा दावा केला आहे.दरम्यान इम्रान यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये ‘व्यवस्था’ हा शब्द नेमका कोणाला उद्देशून वापरला हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. सातत्याने पाकिस्तानच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या लष्करानेच इम्रान यांना बाजूला करण्याचे कारस्थान आखल्याचे बोलले जाते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी इम्रान खान यांची भेट घेतली होती.

या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या भेटीत आपल्यासमोर तीन पर्याय ठेवण्यात आल्याचा दावा इम्रान यांनी केला. ‘आम्हाला निवडणुका घेणे हाच चांगला पर्याय वाटतो. मी राजीनामा देण्याचा विचार देखील करू शकत नाही. राहिला प्रश्न अविश्वासदर्शक ठरावाचा यावर शेवटपर्यंत लढा देऊ.’ असेही इम्रान यांनी म्हटलेे. अविश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या पार्श्वभूमीवर ‘तेहरिके इन्साफ’च्या अनेक खासदारांनी विरोधकांना पाठिंबा देऊ केला आहे. यावर ते म्हणाले की, ‘‘अशा लोकांना सोबत घेऊन सरकार चालविणे शक्य नाही त्यामुळे पुन्हा निवडणुका होणे कधीही चांगलेच असा दावा त्यांनी केला.’’

भारतासोबत चर्चेची तयारी: बाजवा

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या लष्कराने भारताबाबत पुन्हा नरमाईची भूमिका घेत सगळे वाद हे शांततेच्या मार्गाने चर्चेच्या माध्यमातून सोडविण्यात यावे असे म्हटले आहे. काश्मीरसह अन्य विषयांवर राजनैतिक मार्गाने तोडगा निघावा अशीच आमची इच्छा असल्याचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी सांगितले. इस्लामाबादेत आयोजित एका सुरक्षा परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे मत मांडले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील जगभरातील अभ्यासक या परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. बाजवा म्हणाले की, ‘‘ आखाती देशांतील एक तृतीयांश एवढे देश हे सध्या कोणत्या ना कोणत्या तरी संघर्षात आणि युद्धामध्ये गुंतले आहेत. या युद्धाच्या ज्वाळा आम्ही आमच्या प्रदेशापासून दूर ठेवल्या हेच आमचे मोठे यश आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''बप्पा तुम्ही भाग्यवान.. कापनीच्या वेळी आलात'' पंकजा मुंडेंकडून बजरंग सोनवणेंना चिमटा

Modi-Shivraj Singh Chouhan : मोदींना पहिल्यांदा कधी भेटले होते शिवराज सिंह चौहान? जाणून घ्या, 'ती' खास आठवण!

Digital Panvel: ‘डिजिटल पनवेल’साठी पहिले पाऊल! महापालिका कार्यालयात किओस्क यंत्रणेचा वापर

Budhwar Peth Pune: तरुण बुधवारपेठेत गेला पण पैसे देताना पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, तीन महिलांनी असं काही केलं की....

10-20 करोड नाही तर सिडनी स्वीनीला बॉलिवूड फिल्मसाठी ऑफर केले इतके रुपये, ती सुद्धा झाली SHOCK !

SCROLL FOR NEXT