Pakistan Rain 
ग्लोबल

Pakistan Rain: पाकिस्तानमध्ये पावसामुळे परिस्थिती गंभीर, आतापर्यंत ८६ जणांचा बळी

Sandip Kapde

Pakistan Rain: भारतात दिल्लीसह उत्तरेत पावसाने हाहाकार माजविला असताना पाकिस्तानमध्येही पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात सहा जणांचा बळी गेला तर नऊ जण जखमी झाले आहेत.

या हंगामात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या ८६ झाली असून १५१ जण जखमी झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. मृतांमध्ये १६ महिला आणि ३७ मुलांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे ९७ घरांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानमधील पंजाबमध्ये सर्वाधिक ५२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (Rain Update)

खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात २० तर बलुचिस्तानमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये २०२३ मध्ये विनाशकारी पूर येण्याची ७२ टक्के शक्यता असल्याचा अंदाज आपत्कालीन व्यवस्थापनाने एप्रिलमध्ये व्यक्त केला होता.

देशातील स्थितीवर १७ उपग्रह आणि ३६ पूर चेतावणी प्रणालींद्वारे लक्ष ठेवत जात आहे, असे पाकिस्तानच्या हवामान बदल मंत्रालयाने सांगितले. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही पुराचा फटका बसला तर पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT