Bhondu Baba sakal
ग्लोबल

मुलगा होईल म्हणत, भोंदूबाबानं गर्भवतीच्या डोक्यात मारला खिळा!

पाकिस्तानमधील भोंदूबाबाचे कृत्य

सकाळ वृत्तसेवा

पेशावर : मुलगा होण्याची हमी देत भोंदूबाबाने गर्भवती महिलेच्या डोक्यात खिळा ठोकण्याची धक्कादायक घटना पाकिस्तानातील पेशावरमध्ये घडली आहे. खिळा पाच सेंटीमीटर लांबीचा होता, मात्र तिच्या सुदैवाने मेंदूला इजा झाली नाही. आणखी धक्कादायक म्हणजे तीन मुलांची आई असलेल्या या महिलेने आपल्या पोटात आणखी एक मुलगी असल्याचे डॉक्टरांना सांगितले.

वेदना होऊ लागल्यानंतर संबंधित महिलेने पक्कड घेऊन स्वतः खिळा काढण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे ती रुग्णालयात गेली. डॉक्टर हैदर खान यांनी याविषयी अधिक माहिती दिली. संबंधित महिला पूर्णपणे शुद्धीवर होती, पण तिला खूप वेदना होत होत्या. कथित धर्मगुरुच्या सांगण्यावरून आपण खिळा ठोकल्याचे ती आधी सांगत होती. नंतर हे कृत्य त्यानेच केल्याची कबुली तिने दिली. हातोडा आणि इतर काही जड वस्तूंचा वापर करून खिळा ठोकण्यात आला होता.

पेशावर पोलिस भोंदूबाबाच्या चौकशीसाठी महिलेकडून आणखी माहिती घेणार आहेत. रुग्णालयातून सीसीटीव्हीचे छायाचित्रण मिळवून ते महिलेकडे जाणार आहोत. आम्ही भोंदूबाबाला लवकरच बेड्या ठोकू, असे पोलिस प्रमुख अब्बास एहसान यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घराणेशाही जिंदाबाद! निष्ठावंत अन् कार्यकर्ते राहिले बाजूला; मुंबईत नेत्यांचे ४३ नातेवाईक रिंगणात, राज्यात १००च्या वर

Miraj Train : प्रवासी संघटनांच्या मागणीला यश; मिरजेतून बंगळूर–मुंबई नवी द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू

Solapur Politics: सुधीर खरटमल यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा; निवडणूक प्रमुख असताना परस्पर एबी फॉर्म दिल्याने नाराज!

Sangli Leopard : बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री शेतात जायला घाबरतात; वन विभाग मात्र अजूनही निष्क्रिय

Sangli : पाच महिने पावसाचे वरदान आणि बोचऱ्या थंडीचा परिणाम; शिराळा तालुक्यात आंबा मोहोर बहरला

SCROLL FOR NEXT