Terrorist Attack 
ग्लोबल

Terrorist Attack : निवडणुकांच्या तोंडावर पाकिस्तानात पोलीस स्टेशनही असुरक्षित! दहशतवाद्यांचा हल्ल्यात 10 पोलीस ठार

Pakistan terrorist attack on police station : पाकिस्तानात आठ फेब्रुवारी रोजी निवडणूका होणार आहेत. याआधी दहशदवादी कारवायांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहेत.

रोहित कणसे

Pakistan terrorist attack on police station : पाकिस्तानात आठ फेब्रुवारी रोजी निवडणूका होणार आहेत. याआधी दहशदवादी कारवायांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात डेरा इस्माइल खान येथे एका पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात १० पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत.

पोलीसांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार खैबर पख्तूनख्वा प्रदेशात झालेला हा हल्ला रात्री उशीरा करण्यात आला. यामध्ये किमान १० पोलीस कर्मचारी ठार झाले तर इतर सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यानी तीन वाजता पोलीस स्टेशनवर हल्ला चढवला. दहशतवाद्यांनी चारही बाजूंनी गोळीबार करत ग्रेनेड हल्ला केला. पोलीसांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण अंधाराचा फायदा घेत दहशतवादी पसार झाले. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी नाकेबंदी केली आहे. तेसेच शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. याठिकाणी रॅपीड अॅक्शन फोर्स देखील तैनात आहे.

पाकिस्तानात आठ फेब्रुवारी रोजी निवडणूका होणार आहेत. याआधी पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बलूचिस्तान मध्ये तीन दहशतवादी हल्ले झाले ज्यामध्ये चार सरकारी कर्मचारी आणि दोन नागरिक ठार झाले होते. यानंतर पाक सुरक्षा दलाने चकमकीत नऊ दहशतवाद्यांना ठार केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Israel Iran War: इस्रायल-इराण तणावाचा परिणाम! दुबई, सौदी, कतारला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे रद्द; वाहतुकीवर युद्धाचे सावट

एक नाही बिग बॉस मराठीच्या घरात होणार तीन वाईल्ड कार्ड ENTRY ? या सेलिब्रिटींची सोशल मिडीयावर चर्चा

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अजित दादांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्राथमिक अहवाल उघड

SCROLL FOR NEXT