IMRAN KHAN IMRAN KHAN
ग्लोबल

पाकिस्तानी रुपयाची अवस्था वाईट; इम्रानच्या कारकिर्दीत स्थिती खराब

देशाच्या इतिहासातील चलनाचे उच्च अवमूल्यन झाले आहे

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तान : पाकिस्तानी रुपयाची (Pakistani Rupee) अवस्था अतिशय वाईट झाली आहे. २०२१ मध्ये पाकिस्तानी रुपया जगातील सर्वांत वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक आहे. २०२१ च्या सुरुवातीपासून पाकिस्तानी रुपयामध्ये १२ टक्क्यांहून अधिक आणि मे च्या मधात १५२.५० डॉलरच्या निचांकी पातळीवर १७ टक्क्यांहून (More than 17 percent decline) अधिक घसरण (The price dropped) झाली आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२१ च्या अखेरीस पाकिस्तान सरकारला अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे वळावे लागेल. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने रुपया स्थिर करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचे वृत्त डॉनने दिले आहे. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) यूएस चलनाचा प्रवाह रोखण्यासाठी आणि मागणी कमी करण्यासाठी साठेबाजी करणाऱ्यांवर आणि तस्करांवर सातत्याने कारवाई करीत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या काळात तीन वर्षे आणि चार महिन्यांत अमेरिकन डॉलरच्या (USD) तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य ३०.५ टक्क्यांनी घसरले (Pakistani Rupee) आहे. पाकिस्तानी रुपयाचे मूल्य ऑगस्ट २०१८ मध्ये डॉलरच्या तुलनेत १२३ रुपयांवरून डिसेंबर २०२१ मध्ये १७७ रुपयांवर घसरले आहे. गेल्या ४० महिन्यांत ही घट ३०.५ टक्के (The price dropped) आहे. यामुळे देशाच्या इतिहासातील चलनाचे उच्च अवमूल्यन झाले आहे.

पश्चिम पाकिस्तान स्वतंत्र बांगलादेश झाला तेव्हा सुमारे ५० वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या चलनाचे इतके अवमूल्यन झाले होते. त्यावेळी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य ४.६ रुपयांवरून ५८ टक्क्यांनी घसरून ११.१ रुपयांवर आले होते.

आर्थिक धोरण पूर्णपणे कोलमडले

देशाचे आर्थिक वर्ष भौतिक धोरण आणि विनिमय दर धोरणांच्या अधीन झाल्याने आर्थिक धोरण तयार करणे पूर्णपणे कोलमडले आहे. सार्वजनिक कर्ज, कर्जसेवा आदींमुळे परिस्थिती बिकट झाली आहे, असे पाकिस्तानच्या चलनाच्या ढासळत्या स्थितीबाबत पाकिस्तानचे माजी आर्थिक सल्लागार डॉ. अशफाक हसन खान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT