pegasus case 29 phones examined malware in 5 but no conclusive proof that it had the spyware says supreme court  esakal
ग्लोबल

Israel-Hamas War: हेरगिरी करणारं 'पेगासिस' आता इस्राइलला करणार मदत! हमासला नमवण्याची तयारी सुरु

अमेरिकेनं या कंपनीवर बंदी घातलेली आहे तसेच भारतातील विरोधी पक्षातील अनेक दिग्गजांची हेरगिरी केल्यानं हे सॉफ्टवेअर चर्चेत आलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

तेल अविव : काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह प्रमुख न्यायाधीश आणि पत्रकार यांची केंद्र सरकारच्या सांगण्यावरुन कथितरित्या हेरगिरी केल्याच्या कारणानं चर्चेत आलेलं 'पेगासिस' स्पाय अॅप पु्न्हा चर्चेत आलं आहे.

या अॅपची निर्माता कंपनी NSO ग्रुप आता इस्राइल-हमास युद्धामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे. ब्लुमबर्गच्या रिपोर्टनुसार हा ग्रुप इस्राइलला मदत करणार आहे. (Pegasus maker to now help Israel find Hamas hostages report)

अमेरिकेनं केलं ब्लॅकलिस्ट

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, NSO ग्रुपला अमेरिकेनं ब्लॅकलिस्ट केलं आहे, त्याचबरोबर कॅन्डिरु नावाची एक स्पायवेअर कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी इस्राइलला त्यांची हेरगिरीच्या क्षमता वाढवण्यासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

ब्लुमबर्गच्या रिपोर्टनुसार, सायबर सिक्युरिटी इंडस्ट्रीची सुत्रं आणि इस्राइल सरकारनं अधिकृतरित्या सांगितलं की, "या दोन्ही सॉफ्टवेअर कंपन्या इस्राइल सरकारला सहकार्य करणार आहेत. तसेच दक्षिण इस्राइलमधून हमासनं ७ ऑक्टोबर रोजी अपहरण केलेल्या लोकांना सोडवण्यासाठी त्यांच्या सेवा मोफत वापरण्याची मुभा देऊ केली जाणार आहे"

कॅन्डिरुचं अधिकृत निवेदन

गुरुवारी आपल्या अधिकृत निवेदनात कॅन्डिरु कंपनीनं म्हटलं की, "सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीत जी काही गरज भासेल त्यासाठी आम्ही मदत करण्यास तयार आहोत. पण अद्याप इस्राइल सरकारनं यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. (Marathi Tajya Batmya)

हमासला नमवण्याची तयारी

दरम्यान, हमास-इस्राइल युद्ध सुरु असल्याची ऐव्हाना सर्वांना माहिती आहेच. या दरम्यान, हमासनं २००हून अधिक लोकांचं अपहरण केलं आहे. यामध्ये अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. इस्राइलला नमवण्यासाठी त्यांचा फायदा करुन घेणार असल्याचं हमासनं म्हटलं आहे. सध्या इस्राइलचं सरकार या अपहरण झालेल्या लोकांच्या सुटकेसाठी विविध देशातील सरकारांशी चर्चा करत आहे. (Latest Marathi News)

हजारो नागरिकांचा मृत्यू

हमासनं ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यात १४०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. यांपैकी बहुतेक लोक हे इस्राइलचे नागरिक आहेत. हा हल्ला म्हणजे इस्राइलवर आत्तापर्यंत झालेला सर्वात शक्तीशाली हल्ला मानला जात आहे.

इस्राइलनं देखील याला प्रत्युत्तर देताना गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर बॉम्ब वर्षाव केला. यामध्ये हजारो पॅलेस्टिनी नागरिकांना जीव गमवावा लागल्याचं पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT