ग्लोबल

बदला घेण्यासाठी Ex बॉयफ्रेंडची गाडी घेतली अन् 49 वेळा....

नामदेव कुंभार

एखाद्याला प्रेमात धोका मिळाल्यानंतर बदला घेण्यासाठी कधी कोण काय करेल हे सांगूच शकत नाही. भावनेच्या ओघात मारहाण , चोरी, खून किंवा काहीही करतात. अशीच एक धक्कादायक घटना चीनमध्ये उघडकीस आली आहे. एका मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने प्रेमात धोका दिला. हे ज्यावेळी तिला समजलं तेव्हा दोघांचं ब्रेक अप झालं. पण बदला घेण्यासाठी मुलीने हद्दच केली.

प्रेमात धोका मिळाल्यामुळे सूडाच्या भावनेनं त्या मुलीनं एक्स बॉयफ्रेंडच्या गाडीने शहरातील एक दोन नव्हे तब्बल 49 ट्रॅफिक सिग्नल तोडले. या गोष्टीमुळे मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडलाही मनस्तापही सहन करावा लागला. त्याच्यावर तुरुंगवारीची वेळही त्याच्यावर आली होती.

रिपोर्ट्सनुसार, चीनमधील शाओक्सिंग (Shaoxing) या शहरात ही घटना घडली असून त्या मुलीचं नाव लू असं आहे. लू हिने बदला घेण्यासाठी एक्स बॉयफ्रेंड चेन याच्या ऑडी कारने 49 वेळा सिग्नल तोडला. लू हिच्या नवीन बॉयफ्रेंडनं बदला घेण्यासाठी मदत केली. जर मदत केली तरच तुझ्याबरोबर डेटला येईल अशी अट लू हिने नवीन बॉयफ्रेंडसमोर ठेवली होती. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी लू आणि तिचा सध्याचा प्रियकर या दोघांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EL NINO IMPACT : 'सुपर एल निनो'चा भारतावर काय होणार परिणाम? गेल्या 7 दशकांतील सर्वात तीव्र हवामान बदलाचा इशारा; देशात माॅन्सूनचा पाऊस 14 टक्के कमी!

अर्थवेध : आमचं काय चुकलं?

करकायदा : कपात केलेला ‘टीडीएस’ जमा न केल्यास...

Marathi News Live Updates : 'वसुधैव कुटुंबकम्'चा विचार स्वीकारा; इतरांची सेवा करणे हे आपले कर्तव्य - मोहन भागवत

स्मार्ट माहिती : निष्काळजीपणा अयोग्यच

SCROLL FOR NEXT