bolsonaro 
ग्लोबल

फायझरच्या व्हॅक्सिनमुळे माणसाची होते मगर? ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचा विचित्र दावा

सकाळ डिजिटल टीम

ब्राझीलिया - ब्राझीलचे राष्ट्रपती जैर ब्लोसोनारो यांनी कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सिनविरोधातील भूमिका कायम ठेवली आहे. आता तर त्यांनी अमेरिकन कंपनी फायजरच्या व्हॅक्सिनवर शंका व्यक्त करताना खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, फायजरची व्हॅक्सिन लोकांना मगर किंवा दाढी असलेल्या महिला बनवू शकते. बोल्सोनारो यांनी सुरुवातीपासूनच कोरोनाला गांभीर्याने घेतलेलं नाही. देशात लसीकरणाला सुरुवात झाली असूनही त्यांनी आपण व्हॅक्सिन घेणार नाही अशी घोषणा केली आहे. 

ब्लोल्सोनारो यांनी गुरुवारी म्हटलं होतं की, फायजरसोबतच्या करारात स्पष्ट लिहिलं आहे की, ते कोणत्याही दुष्परिणामांसाठी जबाबदार नाहीत. जर तुम्ही मगर झालात तर ती तुमची अडचण असेल. ब्राझीलमध्ये व्हॅक्सिनची टेस्ट गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरु होत्या. ब्रिटन आणि अमेरिकेच्या बाहेरील लोकांनाही कोरोनाची व्हॅक्सिन दिली जात आहे. बोल्सोनारो यांनी म्हटलं की, जर तुम्ही सुपरह्यूमन बनलात, महिलांना दाढी आली किंवा पुरुष महिलांच्या आवाजात बोलू लागले तर त्याची जबाबदारी कंपनी घेणार नाही. 

देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात करताना बोल्सोनारो यांनी सांगितलं की, व्हॅक्सिन फ्री असेल मात्र ते घेण्याचं बंधन नाही. देशात सर्वोच्च न्यायालायने व्हॅक्सिन घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं असलं तरी लोकांवर याची सक्ती करता येणार नाही असंही मत नोंदवलं होतं. याचा अर्थ व्हॅक्सिन घेतलं नाही म्हणून लोकांना दंड केला जाऊ शकतो, सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर बंदी घालू शकतात पण जबरदस्तीने व्हॅक्सिन दिलं जाऊ शकत नाही. 

ब्राझीलमध्ये 71 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ब्राझीलमध्ये 1 लाख 85 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहेत. ब्लोसोनारो यांनी सांगितलं की व्हॅक्सिनला ब्राझीलच्या अन्विसा संस्थेकडून सर्टीफिकेट मिळाल्यानंतर मला सोडून सर्वांना व्हॅक्सिन मिळू शकेल. मी व्हॅक्सिन घेणार नाही. ब्लोसोनारो यांनी जुलै महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT