Rishi Sunak 
ग्लोबल

UK Election: ऋषी सुनक यांनी निवडणुकीची घोषणा करून घेतली 'रिस्क'; सत्तेत येणं किती आव्हानात्मक? जाणून घ्या

Rishi Sunak has called a surprise general election for 4 July: ब्रिटिशचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बुधवारी सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे. यूकेमध्ये ४ जूलै रोजी निवडणुका होणार आहेत

कार्तिक पुजारी

लंडन- ब्रिटिशचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बुधवारी सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे. यूकेमध्ये ४ जूलै रोजी निवडणुका होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या तारखेबाबत चर्चा होत होती. त्यानंतर आपल्या कार्यालयाबाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तारीख जाहीर केली. काही लोकांच्या अपेक्षेपेक्षा लवकर निवडणुका होणार आहेत, असंही ते म्हणाले.

सध्या यूके आर्थिक संकटातून जात आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. अशा स्थितीत लवकर निवडणुकांची घोषणा करून ऋषी सुनक यांनी रिस्क घेतल्याची चर्चा आहे. कारण, या निवडणुकीमध्ये सुनक यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या १४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीला पुन्हा सत्तेवर दावा करणे कठीण मानलं जात आहे.

ऋषी सुनक यांनी मात्र विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यूकेच्या लोकांना त्यांनी सुंदर भविष्याचे स्वप्न दाखवलं आहे. शिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, ब्रिटनच्या लोकांना आपले भविष्य निवडण्याचा आणि आर्थिक स्थिती सुधारण्याची वेळ आली आहे. आर्थिक प्रगतीला वाढवायचं आहे की पुन्हा पूर्वीच्याच स्तरावर जायचंय याबाबत लोकांनी निर्णय घ्यायचा आहे, असं ते म्हणाले.

तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, सुनक यांचा पक्ष सध्या विरोधी लेबर पार्टीपेक्षा खूप मागे आहे. याशिवाय सुनक यांचे कंझर्व्हेटिव्ह पक्षावरील नियंत्रण सुटलेले आहे. ते पुन्हा स्थापित करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. सुनक हे आठ वर्षामधील पाचवे पंतप्रधान आहेत. त्यांनी लिज ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये पदाची शपथ घेतली होती. लिझ ट्रस हे केवळ ४४ दिवस सत्तेत होते.

ऋषी सुनक हे कोरोना महामारीच्या काळात अर्थमंत्री होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावरच त्यांना पंतप्रधानपदाची संधी देण्यात आली. पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी आर्थिक धोरणाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षात विकास दरामध्ये वाढ नोंदवली गेली आहे. हा मुद्दा त्यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT