Italian Prime Minister Giorgia Meloni shares a special selfie message to wish PM Narendra Modi on his birthday.

 

esakal

ग्लोबल

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

PM Modi birthday wishes: वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींवर देशभरातूनच नव्हे तर जगभरातील दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Mayur Ratnaparkhe

PM Modi Receives Birthday Wishes from Italy’s Giorgia Meloni: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५वा जन्मदिवस आहे, यानिमित्त त्यांच्यावर देशभरातूनच नव्हेत तर जगभरातील दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही पंतप्रधान मोदींनाच खास शुभेच्छा दिल्या आहेत. मेलोनी यांनी शुभेच्छा देताना, मोदींवर कौतुकाच वर्षाव केला आहे. मोदींचे नेतृत्व आणि भारताची प्रगती याबद्दलची मोदींची कटिबद्धता याची मेलोनी यांनी प्रशंसा केली आहे.

मेलोनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर मोदींसोबतचा सेल्फी शेअर करत, इटालियन भाषेत मेलोनी म्हणाल्या, ‘’भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांची ताकद, त्यांचा दृढसंकल्प आणि लाखो लोकांचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता प्ररेणास्त्रोत आहे. मी मैत्रा आणि सन्मानासह भारताला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणे आणि आपल्या देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना आरोग्य आणि उर्जा मिळावी यासाठी प्रार्थना करते.’’

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यासह जगभरातील अनेक बड्या देशाच्या प्रमुखांनीही मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच मोदींना फोन करून खास शुभेच्छा दिल्या होत्या. एवढंच नाहीतर रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी भारताकडून मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल आभारही व्यक्त केले.

याशिवाय इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यान्याहू यांनही पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्या दिल्या आहेत. तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषि सुनक, न्यूझिलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्स आणि भूटानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांनी देखील मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What IS Gold Rate Today : सोन्याने सलग तिसऱ्या दिवशी घेतली उसळी, चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील १० ग्रॅमचा आजचा भाव

Crime News: भीतीदायक घटना! गाडीवर कोयता नाचवत पुण्यात रस्त्यावर दहशत माजवणारा तरुण, नागरिकांनी थांबवलं अन् मग काय घडलं?

Pune Metro : पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो मार्गांचे काम सहा महिन्यांत सुरू होणार; पुणे शहरातील मेट्रोचे जाळे ११० किलोमीटरपर्यंत विस्तारले जाणार

NCP leader Ram Khade : शरद पवार यांच्या नेत्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला, प्रकृती चिंताजनक; टोळक्याने आधी गाडी फोडली अन्...

Elephant Viral Video: जेव्हा एक हत्ती अन् सिंहीण समोरासमोर आले, पुढे जे घडलं ते पाहून थक्क व्हाल!

SCROLL FOR NEXT