PM Modi Nepal Visit ANI
ग्लोबल

बुद्ध जयंतीनिमित्त PM मोदी नेपाळ दौऱ्यावर, नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Nepal Visit) बुद्ध जयंतीनिमित्त (Buddha Jayanti 2022) हे त्यांचे समकक्ष शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून आज सोमवारी नेपाळला भेट देत आहेत. मोदी आज मायादेवी मंदिरात प्रार्थना करणार आहेत. भारत आणि नेपाळमधील संबंध अधिक दृढ करणे हा या भेटीमागचा उद्देश आहे, असं पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

“नेपाळसोबतचे आमचे संबंध अतिशय चांगले आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यातील सभ्यता आणि लोकांमधले संपर्क हे आमच्या घनिष्ठ नातेसंबंधाचे उदाहरण आहे. शतकानुशतके जोपासलेले हे संबंध साजरे करणे आणि संबंध आणखी दृढ करणे हा माझ्या भेटीचा हेतू आहे'', असं मोदींनी यापूर्वी सांगितलं होतं.

पंतप्रधानांच्या नेपाळ दौऱ्याची रुपरेषा काय? -

  1. पंतप्रधान मोदी बुद्ध जयंतीनिमित्त मायादेवी मंदिरात प्रार्थना करणार आहेत. त्यांच्यासोबत नेपाळचे पंतप्रधान देउबाही असतील. माया देवी मंदिर हे लुंबिनीमधील मुख्य उपासनेचे ठिकाण आहे, जे परंपरेने गौतम बुद्धांचे जन्मस्थान मानले जाते. PM मोदी अशोक स्तंभासमोर लोणीचा दिवा लावतील आणि 2014 च्या नेपाळ भेटीदरम्यान त्यांनी भेट दिलेल्या बोधी वृक्षाला पाणी देतील.

  2. जलविद्युत, विकास आणि कनेक्टिव्हिटी यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी नेपाळचे पंतप्रधान देउबा यांच्याशी चर्चा करतील. द्विपक्षीय बैठकीनंतर दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्याबाबत काही सामंजस्य करारांची देवाणघेवाण होण्याची अपेक्षा आहे.

  3. लुंबिनी मोनास्टिक झोनमध्ये इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेजची पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत.

  4. याशिवाय, ते नेपाळ सरकारने आयोजित केलेल्या बुद्ध जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ते बौद्ध विद्वान आणि भिक्षूंसह नेपाळ आणि भारतातील लोकांच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित करतील.

2014 पासून पाचवी भेट -

  • 2014 मध्ये भारताच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पाचवा नेपाळ दौरा असेल. 2019 मध्ये पुन्हा निवडून आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिला नेपाळ दौरा असेल.

  • अलिकडच्या वर्षांत भारत आणि नेपाळमध्ये उच्चस्तरीय भेटी आणि अधिकृत संवादांची नियमित देवाणघेवाण होत आहे.

  • नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी ऑगस्ट 2017 मध्ये आणि पुन्हा एप्रिल 2022 मध्ये भारताला भेट दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT