ग्लोबल

मोदी अमेरिकेत! सामरिक भागीदारी बळकट होणार; बायडेन यांच्याशी करणार चर्चा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. अमेरिकेशी व्यापार आणि सामरिक भागिदारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या दौऱ्यामध्ये मोदी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह क्वाड मधील सहकारी जपानचे पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांना भेटणार आहेत. याशिवाय संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेतही मोदींचे भाषण होणार आहे.

पंतप्रधान मोदी विशेष विमानाद्वारे अमेरिकेला आज रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयातर्फे त्यांच्या दौऱ्याची माहिती देणारे ट्विट करण्यात आले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा ताफा पंतप्रधानांसमवेत रवाना झाला आहे. तसेच या दौऱ्याचे महत्त्व अधोरेखित करणारे पंतप्रधानांचे वक्तव्य देखील परराष्ट्र मंत्रालयातर्फे जारी करण्यात आले. हा दौरा अमेरिकेशी व्यापक वैश्विक सामरिक भागीदारी आणखी बळकट करणारा असेल. तसेच जपान आणि ऑस्ट्रेलियाशी संबंध दृढ बनविण्याबरोबरच जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर परस्पर सहकार्य वृद्धींगत करण्यासाठी देखील ही संधी असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे ‘क्वाड’ देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीचा उल्लेख करताना मोदींनी म्हटले आहे की मार्चमध्ये झालेल्या क्वाडच्या बैठकीचा आणि प्रशांत भारत क्षेत्रातील आगामी प्राधान्यक्रमाचा आढावा यात घेतला जाईल.

या दौऱ्यामध्ये मोदी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी चर्चा करणार आहेत. अफगाणिस्तान, दहशतवाद हे मुद्दे चर्चेत असतील. शिवाय, विज्ञान तंत्रज्ञानाचे आदान प्रदान, व्यापार वृद्धी यावरही भर असेल.भारतात गुंतवणूक वाढविण्यासाठी अमेरिकी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी देखील मोदी संवाद साधणार आहेत. याखेरीज भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांची सहकार्य संघटना असलेल्या क्वाडच्या राष्ट्र प्रमुखांच्या बैठकीतही पंतप्रधान मोदी सहभागी होणार असून जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय संबंधांवर स्वतंत्रपणे चर्चा करतील. दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेमध्ये देखील मोदी भाषण करणार आहेत. यामध्ये कोरोना सारखी वैश्विक साथ, दहशतवाद, पर्यावरण बदल यासारख्या विषयांवर ते भारताची भूमिका मांडतील. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या विस्तारावर आणि स्थायी सदस्यत्वासाठी भारताचा असलेला आग्रह यावरही ते बोलतील. सद्यस्थितीत अस्थायी सदस्य असलेल्या भारताकडे या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: बारामतीत राजकीय विजयापेक्षा भावनिक जखम अधिक खोल, मतमोजणी केंद्रावर शांततेचं सावट! काहींच्या डोळ्यांत अश्रू

Zilla Parishad Election Result: संभाजी नगरमध्ये पुन्हा एमआयएमची चमक; जिल्हा परिषदेत कुणाला किती जागा मिळाल्या?

Satej Patil Kolhapur : कंप्लीट धुरळा! राज्यातील पहिली सर्वात तरूण उमेदवार कोल्हापूरमधून काँग्रेसच्या सोनाली पाटील विजयी, गगनबावड्यात सतेज पाटलांनी गड राखला

Dharashiv ZP Election Result : एका मताचे महत्त्व ! ढोकीमध्ये ठाकरे सेनेच्या अमर समुद्रेंचा अवघ्या १ मताने विजय, भाजपच्या उमेदवाराचा निसटता पराभव

Patan ZP Election Result : पाटणच्या राजकारणात मोठा उलटफेर; पाटणकरांचा बालेकिल्ला ढासळला, शंभूराज देसाईंचे 'निर्भेळ' यश

SCROLL FOR NEXT