PM Modi And Putin Esakal
ग्लोबल

PM Modi And Putin: "प्रिय मित्र..." पीएम मोदी पुतिन यांच्या निवासस्थानी पोहचताच काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Modi On Russia Tour: रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये पीएम मोदी यांचे व्लादिमीर पुतिन स्वागत करत असल्याचे दिसत आहे.

आशुतोष मसगौंडे

रशियाच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची सोमवारी रात्री मॉस्कोजवळील रशियन राष्ट्राध्यक्षांच्या नोवो-ओगार्योवो निवासस्थानी अनौपचारिक बैठक झाली.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये पीएम मोदी यांचे व्लादिमीर पुतिन स्वागत करत असल्याचे दिसत आहे.

सोमवारी रात्री पोस्ट करण्यात आलेल्या या क्लिपमध्ये पंतप्रधान मोदी पुतिन यांच्या निवासस्थानी आल्यावर दोन्ही नेते एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे.

पुढे, पुतिन यांनी पीएम मोदी रशिया दौऱ्यावर आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हणाले, "प्रिय मित्र, तुमचे स्वागत आहे. तुम्हाला पाहून मला खरोखर आनंद झाला आहे."

"मॉस्कोजवळील रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या नोवो-ओगार्योवो निवासस्थानी, व्लादिमीर पुतिन आणि रशियाच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असलेले भारतीय पंतप्रधान @narendramodi यांची अनौपचारिक बैठक झाली," असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने X वर म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी रात्रीच्या जेवणासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचल्यावर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. रात्रीच्या जेवणानंतर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना गोल्फ कार्टमध्ये बसवले आणि सरकारी निवासस्थानात फेरफटका मारला. यादरम्यान पुतिन यांनी स्वत: गोल्फ कार्ट चालवली.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच रशिया दौरा आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी शिखर चर्चेसाठी पंतप्रधान मोदी सोमवारी रशियाला पोहोचले. पीएम मोदींच्या या दौऱ्याकडे व्यापक भू-राजकीय संदर्भ आणि संकेत म्हणून पाहिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT