Prime Minister Narendra Modi speaks to Ukraine’s President Volodymyr Zelenskyy over the phone, focusing on peace initiatives and bilateral ties.  esakal
ग्लोबल

PM Modi and Zelenskyy : मोठी बातमी! आता मोदी अन् झेलेन्स्कींचीही झाली चर्चा; जाणून घ्या, कोण काय म्हणाले?

Narendra Modi talk with Volodymyr Zelenskyy :नेमकी काय चर्चा झाली, याबाबत पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांनी दिली आहे माहिती?

Mayur Ratnaparkhe

PM Modi’s Call with Ukraine President Zelenskyy: अमेरिका आणि भारत यांच्यात सध्या ट्रेड वॉर उद्भवला आहे. अमेरिकेने भारतावर अन्यायकारक पद्धतीने टॅरिफ लावला आहे. त्यानंतर आता भारतानेही खमकी भूमिका दर्शवली आहे. एकीकडे ही घडामोड घडली असताना दुसरीकडे आता जगभरातील बलाढ्य देशांकडून भारता पाठिंबा मिळताना दिसत आहे. आधी रशिया नंतर चीन आणि आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा दिसून येत आहे.

दरम्यान, झेलेन्स्की आणि मोदी यांच्यात चर्चा अशावेळी झाली आहे. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची अलास्का येथे विशेष भेट होणार आहे. दोन्ही नेते या दरम्यान रशिया आणि युक्रेन युद्ध समाप्त करण्यावर चर्चा करू शकतात. तर पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांची गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये भेट झाली होती आणि या दरम्यान दोघांमध्ये युद्ध संपवण्याबद्दल चर्चा झाली होती.

विशेष म्हणजे झेलेन्स्कींशी झालेल्या चर्चेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या एक्सवरील पोस्टद्वारे माहिती दिली आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींशी चर्चा करून आणि सद्य परिस्थितीतील घटनाक्रमावर त्यांचे विचार जाणून घेवून मला आनंद झाला. मी संघर्षाच्या जलद आणि शांततापूर्ण निराकरणाच्या गरजेबद्दल भारताच्या ठाम भूमिकेबद्दल त्यांना सांगितले आहे. भारत या संदर्भात शक्य तितके योगदान देण्यास तसेच युक्रेनशी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे.'

झेलेन्स्की यांनी एक्स वर या चर्चेबद्दल लिहिले आहे की, 'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझी दीर्घ चर्चा झाली. आमचे द्विपक्षीय सहकार्य आणि एकूण राजनैतिक परिस्थिती, अशी आम्ही सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. आमच्या लोकांना दिलेल्या स्नेहपूर्ण पाठिंब्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे. मी त्यांना आमच्या शहरांवर आणि गावांवर रशियाच्या हल्ल्यांबद्दल आणि काल जापोरिज्जिया येथील बस स्थानकावर झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितले. रशियाने येथील एका नियमित शहरी सुविधेवर जाणूनबुजून केलेल्या बॉम्बस्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत आणि हे अशा वेळी आहे जेव्हा युद्ध संपवण्याची राजकीय शक्यतेचा शेवट आहे. युद्धबंदीची तयारी दाखवण्याऐवजी, रशिया केवळ कब्जा आणि हत्या सुरू ठेवण्याची आपली इच्छा दाखवत आहे.'

झेलेन्स्की यांच्या मते, भारत शांतता प्रयत्नांना पाठिंबा देत आहे आणि युक्रेनशी संबंधित सर्व गोष्टी युक्रेनच्या सहभागाने ठरवल्या पाहिजेत या भूमिकेशी सहमत आहे, हे महत्त्वाचे आहे. इतर पद्धती परिणाम दिसणार नाहीत. झेलेन्स्की यांनी असेही म्हटले की पंतप्रधान मोदी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान द्विपक्षीय बैठक आणि भेटींच्या अदाण-प्रदाणवर काम करण्यास सहमत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार! कधी अन् कुठे, IMDने तारीखच सांगितली

Zomato delivery boy accident: झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात पडला उघड्या गटारात अन् मग...

मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेचे काम अंतिम टप्प्यात, प्रवासात पाच तासांची बचत; कधीपासून होणार वाहतूक सुरु?

Mhada House: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाचे घर होणार आणखी स्वस्त, किती टक्क्यांनी घटणार; वाचा अहवाल

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT