PM Modi  Esakal
ग्लोबल

PM मोदी दौऱ्यावर अन् चर्चा नाय असं होईल का? G7 शिखर परिषदेत सुद्धा मोदींचं जॅकेट चर्चेत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असतात

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या पगडीची चर्चा होते, कधी त्यांच्या शालीची तर कधी त्यांच्या जॅकेटची. यावेळीही नरेंद्र मोदी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे G7 शिखर परिषदेत त्यांनी परिधान केलेले जॅकेट.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत पुनर्वापर केलेल्या साहित्यापासून बनवलेले विशेष जॅकेट परिधान केले होते. त्यामुळे त्यांचे हे जॅकेट चर्चेचा विषय बनले आहे. आज जगाला ज्याची गरज आहे ते आचरणात आणण्याचा संदेश पंतप्रधानांनी यावेळी दिला आहे. पंतप्रधान मोदींनीही आपल्या परदेश दौऱ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यावर मोठा भर दिला आहे.

जपानमधील हिरोशिमा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांनी केले, जे भारतीय शांतता आणि अहिंसेचे मूल्य सांगतात. पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीशी निगडीत भाषाशास्त्रज्ञ आणि कलाकार यांचीही यावेळी भेट घेतली आणि त्यांना प्रोत्साहन दिलं.

दरम्यान 8 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी फिकट निळे जॅकेट परिधान करून लोकसभेत पोहोचले होते. हे जॅकेट प्लास्टिकच्या बाटल्यांचे पुनर्वापर करून बनवले होते. त्यानंतरही बरीच चर्चा झाली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने हे जॅकेट बेंगळुरू येथील इंडिया एनर्जी वीकमध्ये पंतप्रधानांना दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT