pm modi bangladesh tour 
ग्लोबल

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर; 15 महिन्यांनंतर परदेशात

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर आहेत. कोरोनामुळे तब्बल 15 महिन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर गेले आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात मोदी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. शुक्रवारी सकाळी मोदी बांगलादेशची राजधानी ढाका इथं पोहचले. सायंकाळी बांगलादेशच्या स्वांतत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात आणि बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्म शताब्दी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान मोदी बांगलादेशमधील काही मंदिरांना भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी ज्या मंदिरांना भेट देणार आहेत तिथं मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असून पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्चला होणार आहे. त्यामुळे मोदींची मंदिरांना भेट महत्त्वाची ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. पंतप्रधान कार्यालयाने मोदींच्या बांगलादेश दौऱ्याची माहिती दिली आहे. 

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीन यांच्यासोबतही मोदी चर्चा करणार आहेत. बांगलादेशने गुरुवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं असन त्यात म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसीय दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये किमान पाच करार केले जाण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांचे प्रतिनिधीमंडळामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी असं म्हटलं की, दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या सामंजस्य कराराची संख्या कमी जास्त होऊ शकते. 

मोदींच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात सतखीरा आणि गोपालगंज इथल्या जेशोरेशवरी आणि ओरकांडी मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणार आहेत. ईश्वरीपूर गावातील प्राचीन अशा जेशोरेश्वरी काली मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितलं की, ऐतिहासिक मंदिरात मोदींच्या स्वागताची आम्ही पूर्ण तयारी केली आहे. आम्हाला आशा आहे की, भारत आणि बांगलादेशच्या लाखो लोकांसाठी मोदी प्रार्थना करताली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT