G7 Summit news 
ग्लोबल

G7 Summit : तुमच्यासाठी काहीपण! मोदींचा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना शब्द, रशियाची काय असेल भूमिका?

Sandip Kapde

G7 Summit : मागील सव्वा वर्षांपासून युक्रेनवर युद्ध लादल्याबद्दल रशियाविरोधातील निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्धार जी-७ गटाने आज केला. युक्रेनला असलेला पाठिंबा आम्ही कधीही मागे घेणार नाही, असे या गटाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. जपानमधील हिरोशिमा येथे सुरु झालेल्या जी-७ गटाच्या परिषदेमध्ये युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदोमिर झेलेन्स्की हेदेखील उपस्थित आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होलोदोमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये युक्रेन-रशिया युद्धानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच आमने-सामने बैठक आहे. यापूर्वी फक्त दोघांमध्ये औपचारीक चर्चा झाली आहे. पंतप्रधान कार्यालयाने या बैठकीचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते. खरं तर, जपानच्या निमंत्रणावरून, जागतिक शक्तिशाली समूह G-7 चे अध्यक्ष नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आले आहेत.

या भेटीत नरेंद्र मोदी म्हणाले की, युक्रेनमधील युद्ध हा संपूर्ण जगासाठी मोठा मुद्दा आहे. याचा जगावर अनेक प्रकारे परिणाम झाला पण मला तो राजकीय किंवा आर्थिक मुद्दा म्हणून दिसत नाही. माझ्यासाठी हा मानवतेचा आणि मानवी मूल्यांचा प्रश्न आहे. युद्धाची वेदना आम्हा सर्वांपेक्षा तुम्हाला चांगली माहिती आहे.

गेल्या वर्षी जेव्हा आमची मुले युक्रेनमधून परतली आणि तेथील परिस्थिती सांगितली तेव्हा तुमच्या नागरिकांचे दुःख मला चांगले समजले. मी तुम्हाला खात्री देतो की भारत आणि मी वैयक्तिकरित्या या परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी आमच्या क्षमतेनुसार जे काही करेल ते नक्कीच करेल, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी झेलेन्स्की यांना आश्वस्त केले.

नरेंद्र मोदी यांच्या या भूमिकेमुळे भारत आणि रशियाच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताचे आणि रशियाचे व्यापार संबंध चांगले आहेत. यावर परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तण्यात येत आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगातील पाश्चिमात्य देशांनी रशियावर सर्व प्रकारचे निर्बंध लादले आहेत. पाश्चिमात्य देशांशी संबंधित देशही रशियाच्या विरोधात उभे राहिले आहेत पण भारताने रशियाशी आपले व्यापार संबंध नेहमीप्रमाणे सुरू ठेवले आहेत. भारत युक्रेन आणि रशियाला चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचे आवाहन सातत्याने करत आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष संपुष्टात आणून हा प्रश्न संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सांगत आहेत. कोणत्याही शांतता चर्चेसाठी भारत सहकार्यासाठी प्रत्येक क्षणी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT