Narendra Modi Video 
ग्लोबल

Narendra Modi Video : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काय घडलं? ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट!

Sandip Kapde

Narendra Modi Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑस्ट्रेलिया दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे दोन्ही देशांमधील मैत्री वाढेल, अशी चर्चा आहे. जपानपासून सुरू झालेल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियात होते. नरेंद्र मोदी यांचे ऑस्ट्रेलियात जल्लोषात स्वागत करण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी स्वागताचे काही क्षण शेअर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सिडनी येथे  ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचीही भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि संरक्षण यासह इतर मुद्द्यांवर मोदी यांनी चर्चा केली.

नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ते म्हणाले,  पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी फलदायी चर्चा झाली. एका ऐतिहासिक सामुदायिक कार्यक्रमापासून ते व्यावसायिक नेत्यांच्या भेटी झाल्या. विविध क्षेत्रातील मान्यवर ऑस्ट्रेलियन लोकांशी संवाद साधला, ही एक महत्त्वाची भेट होती. जी भारतासोबतच्या मैत्रीला बळ देईल.

पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देखील ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सिडनीचे स्वरूप बदलले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल अँथनी अल्बानीज यांच्यासह ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायासाठी आयोजिक एका भव्य कार्यक्रमात सहभागी झाले होते . या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी  मोदींना 'द बॉस' म्हटले आणि त्यांच्या लोकप्रियतेची तुलना महान रॉकस्टार ब्रुस स्प्रिंग्स्टीनशी केली.

"मी शेवटच्या वेळी ब्रूस स्प्रिंगस्टीनला या मंचावर पाहिले होते. मात्र पंतप्रधान मोदींचे जसे भव्य स्वाग झाले तसे त्यांचे झाले नव्हते. पंतप्रधान मोदी हे बॉस आहेत. गेल्या वर्षी भारत आणि ऑस्ट्रेलियाने आर्थिक सहकार्य व्यापार करार (ECTA) ला अंतिम रूप दिले आणि तो डिसेंबरमध्ये लागू झाला. दोन्ही बाजू आता सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारावर (CECA) काम करत आहेत," असे अल्बानीज यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT