PM-Narendra-Modi
PM-Narendra-Modi 
ग्लोबल

अमेरिकेचा निरोप घेताना मोदी म्हणाले,...

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : 'हाउडी, मोदी', संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील भाषण आणि यानिमित्ताने अनेक देशांच्या प्रमुखांशी चर्चा असा भरगच्च कार्यक्रम उरकून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता.28) अमेरिकेहून मायदेशाकडे रवाना झाले. अमेरिकेत घेतलेल्या भेटीगाठींचा भारताला मोठा फायदा होऊन विकासात हातभार लागणार आहे, असा विश्‍वास मोदींनी व्यक्त केला आहे. 

भारताकडे रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून दौऱ्याची थोडक्‍यात माहिती दिली. 'जनते-जनतेमध्ये संवाद हा भारत-अमेरिका दौऱ्याचा आत्मा आहे. 'हाउडी मोदी' हा कार्यक्रम मी कधीही विसरणार नाही. अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली, यातूनच भारत-अमेरिकेमधील दृढ संबंध दिसून येतात. येथील भारतीय समुदायाचीही भूमिका यात महत्त्वाची होती.

या दौऱ्यादरम्यान अनेक जागतिक नेत्यांशी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली, अमेरिकेतील व्यापाऱ्यांबरोबर चर्चा केली. भारतात गुंतवणूक वाढविणे आणि विकासाचा वेग वाढविणे, हा या दौऱ्याचा उद्देश होता. जगातील उद्योग भारतात येण्यास उत्सुक आहेत,' असे मोदींनी सांगितले. 

पंतप्रधान मोदींनी भारतात परतण्यापूर्वी भूतान, बांगलादेश, सायप्रस या देशांच्या प्रमुखांची भेट घेतली. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांबरोबरच दहशतवादाबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. दहशतवादाशी एकत्रितपणे लढण्याची आवश्‍यकता या वेळी व्यक्त करण्यात आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT