सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. लग्नाच्या तर अनेक गोष्टी चर्चेत असतात. असंच लग्नाचं एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. दोन मुली आणि एका मुलाने एकाचवेळी एकमेकांशी लग्न केलंय. हे तिघेही रिलेशनशिपमध्ये होते. सध्या या अनोख्या लग्नाची सगळीकडे चर्चा होतेय.
हे तिघेही इंस्टाग्रामवर त्यांच्या Polyamory (एकापेक्षा जास्त लोकांसोबत रिलेशनमध्ये असणे) रिलेशनशिपमुळे विशेष चर्चेत आहेत. ते त्यांच्या फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. (polyamorous throuple love story three partners married with each other)
हे ही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
अमेरिकेत राहणारे या तिन्ही पार्टनर्सचे नाव जिम्मी सिल्वा, चाचा वा वूम आणि समर पेल्टियर आहे. चाचा वा वूम आणि जिम्मी दहा पेक्षा जास्त वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे. ते पहिल्यांदा शाळेत भेटले होते. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी एकमेकांना डेट करणे सुरू केले.
चाचा ही बायसेक्शुअल आहे. तिला या रिलेशनशिपमध्ये तिसऱ्या व्यक्तीलाही सहभागी करुन घ्यायचं होतं. जेव्हा या दोघांना समर मिळाली तेव्हा त्यांना हे परफेक्ट Polyamory रिलेशनशिप होऊ शकतं असं वाटलं.
एप्रिल 2019 पासून तिघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि या तिघांनी फेब्रुवारी 2020 मध्ये एकमेकांसोबत लग्न केले .
जिम्मी 34 वर्षाचा, चाचा 32 वर्षाची आणि समर 28 वर्षाची आहे. जिम्मीची इच्छा होती की या दोन्ही पत्नींनी एकत्र बाळांना जन्म द्यावा पण चाचाने जुन 2021 मध्ये बाळाला जन्म दिला तर समर सध्या प्रेग्नंट आहे.
सोशल मीडियावर हे तिन्ही पार्टनर खूप अॅक्टीव्ह असतात. ते त्यांच्या वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावर त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.