abhinandan poster in pakistan 
ग्लोबल

पाकिस्तानमध्ये अभिनंदन वर्धमान आणि मोदींचे पोस्टर्स; जाणून घ्या काय आहे कारण

सकाळवृत्तसेवा

लाहोर : पाकिस्तानमध्ये परत एकदा भारतीय वायुसेनेचे पराक्रमी पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांचे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर्स पाकिस्तानच्या रस्त्यावर लागले आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून नवाज शरीफ यांच्या पक्षाने पाकिस्तानातील मुस्लिम लीगचे नेता अयाज सादिकवर निशाणा साधला आहे. अनेक पोस्टर्समध्ये अयाज सादिक यांना देशद्रोही म्हणत त्यांची तुलना मीर जाफरसोबत केली गेली आहे. याआधी अयाज सादिक यांनी पाकिस्तानच्या संसदेत बोलताना अभिनंदन यांना भारताकडे परतवताना झालेली पाकिस्तानची अवस्था विषद केली होती. 


देशद्रोही ठरवून लावले पोस्टर्स
अयाज सादिक यांच्या मतदारसंघात म्हणजेच लाहोरच्या रस्त्यांवर हे पोस्टर्स जाणीवपूर्वक लावले गेले आहेत. यामध्ये उर्दू भाषेत पीएमएल-एन पक्षाचे नेते अयाज सादिक यांना देशद्रोही ठरवलं गेलं आहे. काही पोस्टर्समध्ये सादिक यांना वर्धमान यांच्या रुपात दाखवलं गेलं आहे तर काही पोस्टर्समध्ये त्यांना भारताचा समर्थक ठरवून पाकिस्तानचा शत्रू ठरवलं गेलं आहे. 

त्यांना भारतात पाठवा
पाकिस्तानच्या गृह मंत्री एजाज अहमद शाह यांनी एका सभेत अयाज सादिक यांना भारतात पाठवण्याचा सल्ला दिलाय. ज्यांनी पाकच्या संसदेत उभं राहून देशातील सैन्याच्या विरोधात वक्तव्य केलं आहे त्यांनी अमृतसरला जाऊन रहावं. पाकिस्तानमध्ये अयाज सादिक यांच्याविरोधात प्रदर्शने होत आहेत. 

मी माझ्या वक्तव्यावर ठाम
अयाज सादिक मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांनी म्हटलं की माझ्याकडे अजूनही काही गुपीते आहेत. मी कोणतेही बेजबाबदारीचे वक्तव्य केलेलं नाहीये. मी राजकीय मतभेदातून हे वक्तव्य केलं होतं. याचा पाकिस्तानच्या सेनेशी संबंध जोडला जाता कामा नये. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मीदेखील पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे नेतृत्व केलं आहे. जेंव्हा पाकिस्तान अथवा आमच्या एकात्मतेची गोष्ट येते तेंव्हा भारतासाठी आमचा संदेश खूपच स्पष्ट आहे. 

भीतीपोटी परतवलं अभिनंदन यांना
अयाज सादिक यांनी काही दिवसांपूर्वा पाकिस्तानच्या संसदेत म्हटलं होतं की, पाकिस्तानने भारताच्या अभिनंदन यांनी सुटका भीतीपोटी केली होती. त्यांनी असं देखील म्हटलं होतं की यासंदर्भातील बैठकीला इमरान खान गैरहजर होते तसेच शाह महमूद कुरैशी सफशेल घाबरले होते. कारण भारत पाकिस्तानवर हल्ला करेल अशी त्यांना भीती वाटत होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Priya Nair: 92 वर्षांत पहिल्यांदाच महिला CEOची निवड; HULच्या नेतृत्वाची जबाबदारी प्रिया नायर यांच्यावर

Video: दिल्ली पुन्हा 100 वर्ष मागे गेल्यासारखी दुरवस्था! पावसानंतरचा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला लावाल हात

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

SCROLL FOR NEXT