Pramod Mittal got a bailout 
ग्लोबल

Pramod MIttal: प्रमोद मित्तल कोण आहेत? त्यांना नायजेरिया 50 कोटी डॉलर का देतंय?

उद्योगपती प्रमोद मित्तल हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दक्षिण आफ्रिकी देश नायजेरियामधून आलेल्या एका बातमीमुळे त्यांच्याबाबत चर्चा सुरु झाली आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- उद्योगपती प्रमोद मित्तल हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दक्षिण आफ्रिकी देश नायजेरियामधून आलेल्या एका बातमीमुळे त्यांच्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी आर्सेलरमित्तलचे सीईओ लक्ष्मी मित्तल यांचे प्रमोद मित्तल हे लहान भाऊ आहेत. लक्ष्मी मित्तल यांचे नाव जगातील टॉप श्रीमंतांमध्ये घेतले जाते. दुसरीकडे, प्रमोद मित्तल हे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना २०२० मध्ये दिवाळखोर घोषित करण्यात आलं होतं.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, नायजेरिया सरकारने त्यांना जवळपास ५० कोटी डॉलर देण्याची तयारी दाखवली आहे. एका करारातील वादाप्रकरणी तडजोड म्हणून नायजेरिया सरकार त्यांना पैसे देणार आहे. २००४ मध्ये प्रमोद यांनी नायजेरियात स्टील कंपनी सुरु केली होती. यासंदर्भात त्यांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे. नायजेरियन मदतीमुळे त्यांचे आर्थिक संकट काही प्रमाणात दूर होण्याती शक्यता आहे.

२०२० मध्ये दिवाळखोर

प्रमोत मित्तल हे २०२० मध्ये दिवाळखोर झाले होते. त्यांच्यावर २ अब्ज डॉलरपेक्षा जास्तीचे कर्ज होते. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या कर्जदारांसोबत एक डिल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आपल्या कर्जाच्या एकूण ०.२ टक्के पैसे परत करण्यास तयारी दर्शवली होती. पण, लंडनच्या एका कोर्टाने त्यांची ही डिल फेटाळली होती.

नायजेरियात सत्ताबदल

नायजेरियामध्ये सत्ताबदल झाला आहे. त्यामुळे प्रमोद मित्तल यांच्यासाठी परिस्थिती चांगली झाली आहे. देशाच्या उद्योग मंत्र्यांचं म्हणणं आहे की, देशात स्टील व्यवसाय पुन्हा उभे करणे त्यांची प्राथमिकता आहे. त्यामुळे प्रमोद मित्तल यांच्यासोबतचा वाद त्यांना मिटवायचा आहे. या तडजोडीनुसार, प्रमोद मित्तल यांना नायजेरिया सरकार जवळपास ५० कोटी डॉलर देण्यास तयार आहे. या पैशांमुळे मित्तल यांना मोठी मदत मिळू शकते.

लक्ष्मी मित्तल

प्रमोद मित्तल यांचे मोठे बंधू लक्ष्मी मित्तल यांच्या आर्सेलरमित्तल कंपनीचे ५९ देशांमध्ये मायनिंग, एनर्जी आणि रिफायनिंगचे व्यवसाय आहेत. कंपनीचे मुख्यालय Luxembourg येथे आहे. २०२२ च्या आकडेवारीनुसार, कंपनीचे उत्पन्न ७९.८ अब्ज डॉलर आहे. मित्तल यांची लंडनमध्ये अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. श्रीमंतांच्या यादीत त्यांचा ९८ वा क्रमांक आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt Employee Property : ४४ भूखंड, किलोभर सोने, कोटींचा बँक बॅलन्स अन्... कर्मचाऱ्याची ‘सोनेरी’ कमाई पाहून तपास यंत्रणाही हादरली !

Delhi : दिल्लीत सुरक्षा रामभरोसे! चोरट्यांनी महिला खासदाराची सोन्याची चेन हिसकावली, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनला शनि अन् मंगळाचे असे दुर्मिळ योग, 3 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षाव

ENG vs IND,5th Test: खांदा निखळला असतानाही इंग्लंडचा खेळाडू फलंदाजीला उतरणार? Video होतोय व्हायरल; जो रुट म्हणाला...

Kharadi IT Hub : खराडी आयटी हबमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता; व्यावसायिकांना टोळक्यांची दहशत

SCROLL FOR NEXT