us president biden 
ग्लोबल

VIDEO - ट्रम्प यांच्यामुळे White House च्या दरवाजात राष्ट्राध्यक्ष बायडेन वेटिंगवर

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक यावेळी खूपच गाजली. निकालानंतर ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांच्या समर्थकांनी घातलेला गोंधळ यामुळे निवडणूक चर्चेत राहिली. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेचं हस्तांतरण तर सहज केलं मात्र बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहिले नाहीत. याशिवाय जाता जाता त्यांनी अनेक धक्कादायक निर्णयही घेतले. दरम्यान, दुसऱ्या बाजुला मोठा संघर्ष करून राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर जो बायडेन पत्नी जिल यांच्यासह व्हाइट हाउसमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना ताटकळत उभा रहावं लागलं. 

व्हाइट हाउसच्या पायऱ्या चढून जेव्हा ते दरवाजाजवळ पोहोचले तेव्हा बायडेन यांनी हात हलवून समर्थकांचे आभार मानले. त्यानंतर जेव्हा दरवाजाकडे वळले तेव्हा त्यांना काही वेळ वाट पहावी लागली. यावेळी अवघडल्यासारखी त्यांची अवस्था झाली होती. 
राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि त्यांची पत्नी जिल जेव्हा आत जाण्यासाठी वळले तेव्हा दरवाजा बंद होता.

बायडेन यांच्यासोबत कुटुंबियसुद्धा पायऱ्या चढून वर आले होते मात्र दरवाजा उघडलाच नव्हता. त्यावेळी बायडेन यांच्यासह इतरांनाही आश्चर्य वाटलं. जगातील सर्वात शक्तीशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षांना वाट बघावी लागली. काही सेकंदासाठीच दरवाजा बंद होता पण त्यामुळे सगळ्यांनाच विचित्र वाटत होतो. जो बायडेन आणि जिल एकमेकांकडे बघत राहिले. त्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. 

व्हाइट हाउसचा हा दरवाजा उघडण्यासाठी उशीर होण्यामागचं कारण ट्रम्प यांनी जाता जाता घेतलेला एक निर्णय़ ठरला. ट्र्म्प यांनी बायडेन व्हाइट हाउसमध्ये येण्याच्या आधी पाच तास तिथल्या चीफ अशरला काढून टाकलं होतं. ट्र्म्प यांच्या या कृतीवर माजी अधिकाऱ्यांनी टीका केली आहे. 

व्हाइट हाउसमधील व्यवस्था ही चीफ अशरकडे असते. टिमोथी हार्लेथ माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे चीफ अशर म्हणजेच मुख्य द्वारपाल होते. ट्रम्प यांच्या माजी कर्मचाऱ्याचीच नियुक्ती मेलानिया यांनी 2017 मध्ये केली होती. बायडेन यांच्या शपथविधीच्या काही तास आधी टिमोथी यांना त्यांची सेवा संपल्याचं सांगण्यात आलं. टिमोथी यांचे वेतन 2 लाख डॉलर इतकं होतं. 

अमेरिकेच्या अनेक माध्यम संस्थांनी या घटनेची निंदा केली आहे. ट्रम्प यांचे हे कृत्य शोभणारं नाही असं म्हटलं आहे. अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही की कोणत्या कारणामुळे राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी यांना दरवाजात वाट पहावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT