legion of merit main.jpg 
ग्लोबल

Legion of Merit: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा सन्मान, 'लीजन ऑफ मेरिट' पुरस्कार प्रदान

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली- अमेरिका-भारत रणनीतिक भागीदारी वाढवण्यासाठी केलेल्या नेतृत्त्वासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लीजन ऑफ मेरिट ( Legion of Merit) पुरस्काराने सन्मानित केले आहे. अमेरिकेत भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.

रॉबर्ट ओब्रायन यांनी टि्वटमध्ये म्हटले की, अमेरिका-भारत रणनीतिक भागीदारी वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी तसेच नेतृत्त्वासाठी त्यांना  राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या दृढ नेतृत्त्व आणि दूरदृष्टीमुळे हा पुरस्कार देण्यात आला आहे. मोदींनी जागतिक शक्तीच्या रुपात भारताला गती दिली आहे आणि जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि भारतादरम्यान रणनीतिक भागीदारी वाढवली आहे. 

ओब्रायन यांनी आपल्या दुसऱ्या एका टि्वटमध्ये म्हटले की, ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानाचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित केले आहे. हे पुरस्कार वॉशिंग्टन डीसी येथे त्या त्या देशांच्या राजदूतांना प्रदान करण्यात आले होते. ट्रम्प यांनी स्वतंत्र आणि खुले भारत-प्रशांत महासागरच्या नेतृत्त्व आणि व्हिजनसाठी मोदी, आबे यांना सन्मानित केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT