ग्लोबल

...म्हणून पेट्रोलचे दर वाढणार!

वृत्तसंस्था

रियाध : सौदी अरेबियातील सर्वांत मोठ्या "आरमको' कंपनीच्या दोन तेल उत्पादक क्षेत्रांवर येमेनी बंडखोरांनी ड्रोनहल्ले केल्यानंतर सौदीने या भागातील तेलाचे उत्पादन थांबविले आहे. या हल्ल्यामुळे सौदीतील तेल उत्पादन पन्नास टक्‍क्‍यांनी घटल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.

सौदीतील या हल्ल्यामुळे भारताच्या चिंताही वाढल्या असून, खुद्द परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आणि तेल कंपन्या तेथील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ताज्या हल्ल्यानंतर देशांतर्गत इंधनाच्या किमती भडकण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

भारतही सौदीकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुन्हा कच्च्या तेलाच्या किमतींनी शंभर डॉलरचा टप्पा ओलांडल्यास भारतीय कंपन्यांचा ताळेबंद बिघडू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. या हल्ल्यानंतर "अबाकिक' आणि "खुराईस' या दोन्ही तेल उत्पादक क्षेत्रांतील उत्पादन तात्पुरते थांबविण्यात आल्याचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुल्लाझीझ बिन सलमान यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ज्या दोन तेल उत्पादक क्षेत्रांवर हे हल्ल करण्यात आले, तेथून रोज 5.7 दशलक्ष बॅरल एवढ्या कच्च्या तेलाचे उत्पादन होत असे. या हल्ल्यामुळे झालेले नुकसान लवकरच भरून काढण्यात येईल, यासंदर्भातील सुधारित माहितीही आम्ही दोन दिवसांनी जाहीर करू, असे "आरमको'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नासिर यांनी सांगितले. 

इराणकडून निषेध 

अमेरिकेने सौदी अरेबियातील या ड्रोनहल्ल्यांसाठी इराणशी संबंधित हुथी बंडखोरांना जबाबदार ठरविले असून, या दहशतवाद्यांना इराणकडूनच शस्त्रपुरवठा केला जात असल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पाम्पिओ यांनी केला आहे. इराणने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. या अनुषंगाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदीच्या राजांशी संवाद साधला, तसेच या भ्याड हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेधही केला आहे. 

हा हल्ला वेगळा 

सौदीचे राजे मोहंमद बिन सलमान यांनीही आक्रमक भूमिका घेत दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. सौदीने इराणच्या तेलक्षेत्रावर हल्ला केला, तर हा संघर्ष आणखी चिघळू शकतो, अशी भीती अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. याआधीही हुथी बंडखोरांनी सौदीच्या तेल उत्पादक क्षेत्रांना लक्ष्य केले होते. पण, हा हल्ला मात्र वेगळा असल्याचे बोलले जाते. 

गोपनीयता कायम 

या हल्ल्यात तेल प्रकल्पाचे नेमके किती नुकसान झाले, कोणत्या शस्त्राचा यासाठी वापर करण्यात आला होता, याबाबतची माहिती सौदीने पत्रकारांना दिलेली नाही. "आरमको' ही सौदीतील सर्वांत मोठी तेल उत्पादक कंपनी असून, या कंपनीने तेलाच्या साठवणुकीसाठी जमिनीखाली वेगळी व्यवस्था केली आहे. ही तेल साठवणुकीची केंद्रे सुरक्षित राहावी म्हणून सौदीने हजारो कोटी डॉलर खर्च केले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

आजचे पंचांग 06 ऑक्टोबर 2026! इंदिरा एकादशी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे चंद्रबळ जाणून घ्या

Marathi News Live Updates: आसाममध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का; ४.५ रिश्टर तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT