Prince Harry Esakal
ग्लोबल

Prince Harry : भारतीय वंशाच्या व्यक्तीने वाचवले ब्रिटनच्या प्रिन्सचे प्राण; पापाराझी करत होते पाठलाग

पापाराझींनी त्यांच्या गाडीचा तब्बल दोन तास पाठलाग केला.

सकाळ डिजिटल टीम

ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल हे मोठ्या संकटातून बचावले. न्यूयॉर्कमध्ये पापाराझींनी त्यांच्या गाडीचा तब्बल दोन तास पाठलाग केला. यावेळी त्यांच्या गाडीचा कित्येक वेळा अपघात होता होता राहिला. अखेर, भारतीय वंशाच्या एका व्यक्तीने त्यांची मदत केली.

प्रिन्स हॅरी आणि मेगन न्यूयॉर्कमध्ये एका विमेन ऑफ व्हिजन या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. तिथून परत येत असताना पापाराझींनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांच्यापासून वाचण्यासाठी प्रिन्स हॅरी आणि मेगन यांना आपल्या गाडीचा वेग वाढवावा लागला. या दरम्यान ही गाडी कित्येक पादचाऱ्यांना आणि इतर गाड्यांना धडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावेळी गाडीत मेगन यांच्या आईदेखील होत्या.

भारतीयाने वाचवले प्राण

यावेळी भारतीय वंशाचे कॅब ड्रायव्हर सुखचरण सिंग यांनी प्रिन्स हॅरी आणि मेगन यांना वाचवले. न्यूयॉर्कमधील ६७ स्ट्रीटवर असताना अखेर प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी आपली गाडी सोडून दिली. खाली उतरून ते सुखचरण यांच्या कॅबमध्ये बसले. साधारणपणे दहा मिनिटं ते सिंह यांच्या कॅबमध्ये बसून राहिले. पापाराझी तिथून निघून गेल्यानंतर हे दाम्पत्य तिथून निघाले.

पापाराझींमुळे गमावली होती आई

प्रिन्स हॅरी यांच्या आई, प्रिन्सेस डायना यांचा मृत्यूही पापाराझींमुळेच झाला होता. १९९७ साली पापाराझींपासून वाचण्यासाठी त्यांनी आपल्या गाडीचा वेग वाढवला होता. अशात अपघात होऊन त्यांचे निधन झाले होते. यावेळी डायना यांच्यासोबत कारमध्ये असलेली त्यांची मैत्रीण आणि कारचा ड्रायव्हर यांचाही मृत्यू झाला होता.

पापाराझी काय असतात

पापाराझी हे स्वतंत्र फोटोग्राफर असतात, जे सेलिब्रिटींच्या दैनंदिन जीवनातील विविध फोटो काढतात. सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यातील कित्येक गोष्टी या पापाराझींमुळे बाहेर येतात. मीडियाच्या तत्वांमध्ये हे बसत नसलं, तरीही अशा फोटोंची किंमत अधिक मिळते; त्यामुळे हे पापाराझी कोणत्याही स्तराला जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; ''हा निव्वळ अपघात...''

Amazon Layoffs : अमेझॉनकडून मोठा निर्णय; आणखी १६ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

IND vs NZ, 4th T20I: इशान किशन संघातून बाहेर, सूर्यकुमारने सांगितलं कारण; कोणाला मिळाली प्लेइंग-११ मध्ये संधी?

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणाकडे रवाना

Latest Marathi News Live Update : खासदार राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील पक्ष नेत्यांची बैठक घेतली

SCROLL FOR NEXT