ग्लोबल

हाँगकाँगचं लोकशाहीवादी वृत्तपत्र पडणार बंद; चीन सरकारवरील टीका भोवली

विनायक होगाडे

हाँगकाँग : हाँगकाँगमधील 'अ‍ॅपल डेली' हे लोकशाहीवादी वृत्तपत्र येत्या रविवारी बंद होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल असे सांगण्यात आले. सरकारी अधिकाऱ्यांनी या वृत्तपत्राची एक कोटी ८० लाख हाँगकाँग डॉलरची मालमत्ता गोठविली. नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा भंग केल्याचा आरोप वृत्तपत्र व्यवस्थापनावर ठेवण्यात आला आहे. मुख्य संपादक रायन लॉ आणि कार्यवाह पदावरील इतर चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या वृत्तपत्राने चीनच्या नेतृत्वावर नेहमीच टीका केली आहे. संस्थापक जिमी लाई यांचे सल्लागार सायमन मार्क्स यांनी काही दिवसांत वृत्तपत्र बंद होऊ शकेल असे संकेत सोमवारीच दिले होते. ते म्हणाले होते की, तुमच्याकडे आर्थिक पाठबळ नसेल तर तुम्ही सेवेची मागणी करू शकत नाही. मुख्य म्हणजे खर्च भागविण्यासाठी रोख रक्कम नसेल तुम्ही लोकांना आर्थिक मोबदल्याचे आश्वासन देऊ शकत नाही. बँक खात्यांवरील कारवाई मागे घेण्यात आली नाही तर वृत्तपत्र बंद पडायला वेळ लागणार नाही.

५०० पोलिसांची कारवाई

गेल्या आठवड्यात हाँगकाँग पोलिसांनी या वृत्तपत्राच्या कार्यालयावर छापे घातले होते. त्यावेळी तब्बल पाचशे पोलिसांनी त्यात भाग घेतला होता. आपल्याला वॉरंटनुसार झडती घेण्याचा आणि पत्रकारितेशी संबंधित साहित्य जप्त करण्याचा अधिकार असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.

३० लेखांचा संबंध

अ‍ॅपल डेलीने २०१९ पासून ३० पेक्षा जास्त टीकात्मक लेख छापल्याच दावा पोलिसांनी केला. हाँगकाँग आणि चीनवर निर्बंध घालावेत असे आवाहन या लेखांद्वारे करण्यात आले.

संस्थापक कारागृहात

या वृत्तपत्राचे संस्थापक जिमी लाई यांना यापूर्वीच कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. २०१९ मध्ये परवानगी नसलेल्या सभेत भाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. लाई हे लोकशाहीवादी चळवळीचे सर्वाधिक नामवंत समर्थक मानले जातात. ते अब्जाधीश आहेत. मे महिन्यात त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांची बँक खाती गोठविण्यात आली. त्यांच्या बँक खात्यात कोणताही व्यवहार केल्यास सात वर्षे कारागृहात डांबले जाईल असा इशारा दोन प्रमुख बँकांना देण्यात आला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT