Queen Elizabeth II 
ग्लोबल

Queen Elizabeth II : राणीच्या साहाय्यिकेचा राजीनामा

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या सहकारी लेडी सुसान हसी यांना वांशिक टिप्पणी केल्याच्या कारणावरून राजीनामा द्यावा लागला

सकाळ वृत्तसेवा

लंडन : ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अत्यंत निकटच्या सहकारी लेडी सुसान हसी यांना वांशिक टिप्पणी केल्याच्या कारणावरून राजीनामा द्यावा लागला आहे. ब्रिटनचे युवराज विल्यम यांच्या त्या ‘गॉडमदर’ होत्या. त्यांच्याकडे बकिंगहॅम पॅलेसमधील राजघराण्याच्या खासगी कामांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती.

राजे चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला यांनी बकिंगहॅम पॅलेस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका धर्मादाय संस्थेच्या प्रमुख एनगोझी फुलानी यांना लेडी हसी यांनी त्यांच्या वंशाबद्दल विचारल्याने वाद निर्माण झाला होता. या कार्यक्रमात लेडी हसी यांनी फुलानी यांना, ‘तुम्ही आफ्रिकेतील कोणत्या भागातील आहात?’ असे विचारले.

धक्का बसलेल्या फुलानी यांनी, आपला जन्म ब्रिटनमध्येच झाला असून आम्ही ब्रिटिशच आहोत, असे सांगितल्यावरही हसी यांनी, तुम्ही खरेच कुठल्या भागातून आला आहात?, असे विचारले. फुलानी यांनीच ट्विटरवरून ही माहिती देताना नाराजी व्यक्त केली होती. यानंतर हसी यांच्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागत राजीनामा दिला. आमच्या समाजात वंशद्वेषाला कोणतेही स्थान नाही, त्यामुळे हसी यांनी राजीनामा दिला हे योग्यच केले, असे बकिंगहॅम पॅलेसने स्पष्ट केले.

लेडी हसी या राणी एलिझाबेथ यांच्या अनेक वर्षांपासूनच्या अत्यंत निकटच्या आणि विश्‍वासू सहकारी होत्या. कोरोना काळात एलिझाबेथ यांचे पती फिलीप यांचे निधन झाले आणि अंत्यसंस्कारासाठी अत्यंत मर्यादित जणांना प्रवेश होता, तेव्हाही एलिझाबेथ यांच्याशेजारी हसी हजर होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT